Sunny Leone’s Photo On Admit Card Dainik Gomantak
देश

Sunny Leone’s Photo On Admit Card: प्रवेशपत्रावर चक्क सनी लिओनीचा फोटो

गोमन्तक डिजिटल टीम

Sunny Leone’s Photo On Admit Card:  टीचर्स एलिजिबिलीट टेस्ट (TET-2022 शिक्षक पात्रता परिक्षा) मध्ये एका परिक्षार्थीच्या प्रवेशपत्रावर चक्क बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीचा फोटो छापल्याचे समोर आले आहे.  हे प्रवेशपत्र इंटरनेटवर व्हायरल झाले असून याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

कर्नाटकात चिकमंगळूर जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. राज्यात 6 नोव्हेंबर रोजी झालेल्या TET परीक्षेत विद्यार्थीनीला हे हॉलतिकीट मिळाले होते. यात तिच्या छायाचित्राच्या ठिकाणी चक्क अभिनेत्री सनी लिओनीचा फोटो छापलेला आहे. याचे स्क्रीन शॉट्स इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. या मुलीचा नंबर रूद्राप्पा कॉलेजमध्ये तिचा नंबर पडला होता. तिने ही गोष्ट तेथील लोकांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर तत्काळ कॉलेजच्या प्राचार्यांनी सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल केली.

पोलिसांच्या माहितीनुसार प्रवेशपत्रावर छायाचित्र फोटो अपलोड करताना ही चूक घडलेली असू शकते. फोटोची खात्री करून फोटो अपलोड केल्यानंतर सबिमिट करतानाही काळजी घेतली जायला हवी होती.

संबंधित विद्यार्थीनीने मात्र तिने स्वतःचा फॉर्म भरलेला नव्हता, तर तिच्या मित्राला भरायला सांगितला होता, असे सांगितले.

राज्याच्या शिक्षण विभागाने मात्र यात विभागाची काहीही भूमिका नसल्याचे म्हटले आहे. अर्ज करताना देण्यात येणारा युजर आयडी आणि पासवर्ड केवळ अर्जदारालाच माहिती असतो. त्यामुळे त्यांनी फोटो अपलोड करावा लागतो, असे शिक्षण विभागाने म्हटले आहे. याबाबत पोलिसांनी दोषींवर कारवाई करावी, असेही विभागाने म्हटले आहे. दरम्यान, कर्नाटकात 781 केंद्रांवर झालेल्या या परीक्षेत 3,32,913 परीक्षार्थींनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

शाळकरी मुलांच्या बाबतीत आपण किती जागरूक, शिक्षित आणि गंभीर आहोत?

विजयनगर साम्राज्य, गोव्याचा संदर्भ; मदुराई आणि कुमार कंपण्णांचा इतिहास याबद्दल जाणून घ्या

Top Most Polluted Countries: जगातील 'हे' 8 देश सर्वाधिक प्रदूषित; क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर!

Goa Politics: दिल्लीत नेमके 'काय' घडले? 'कुणाला' समज, 'कुणाला' आदेश..

SCROLL FOR NEXT