Ramdev Baba  Dainik Gomantak
देश

'दिशाभूल करणाऱ्या जाहिराती थांबवा, अन्यथा प्रत्येक उत्पादनावर 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावू' SC ने पतंजलीला फटकारले

इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती.

Pramod Yadav

SC On Patanjali: सर्वोच्च न्यायालयाने योगगुरू बाबा रामदेव आणि त्यांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेडला आधुनिक औषधांबद्दल केलेल्या टिप्पणीबद्दल फटकारले.

न्यायालयाने पतंजलीला दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि चुकीची औषधे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा मोठा दंड ठोठावला जाईल, असा इशाराही न्यायालयाने पतंजलीला दिला आहे.

सर्व प्रकारच्या आजार बरा करण्याचा दावा करणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती थांबवण्याचा प्रस्ताव आणण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला केली. यामुळे दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि अवाजवी दावे थांबवता येतील, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

'तुम्ही (पतंजली) जे करत आहात ते कायद्याचे उघड-उघड उल्लंघन आहे. तुम्ही असेच करत राहिल्यास आम्ही ते गांभीर्याने घेऊ आणि प्रत्येक उत्पादनावर एक कोटी रुपयांचा दंडही ठोठावू', असे न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. यात सर्व रोग बरे करण्याचा दावा करणाऱ्या आणि अॅलोपॅथीच्या औषधांच्या परिणामकारकतेवर शंका उपस्थित करून डॉक्टरांची बदनामी करणाऱ्या व दिशाभूल करणाऱ्या सर्व जाहिरातींच्या विरोधात आदेश देण्यात आला होता.

पतंजली आयुर्वेदचे या याचिकेत प्रतिवादी म्हणून नाव देण्यात आले आहे, गेल्या वर्षी जुलैमध्ये एका अग्रगण्य वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीचा यात संदर्भ दिला होता.

दरम्यान, अ‍ॅलोपॅथी का आयुर्वेद उत्तम? या वादात पडण्याचा आपला हेतू नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला सर्व प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना सामोरे जाण्यासाठी “सर्वसमावेशक उपाय” आणण्याची सूचना केलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 11 खून, अपहरण, चोऱ्या! गुन्हेगारीत परप्रांतीयांचा वाढता सहभाग चिंताजनक; कृतिदल स्‍थापण्‍याची मागणी

Nikolai Patrushev Goa visit: गोव्याच्या सागरी क्षेत्रातील प्रगतीची रशियाकडून प्रशंसा! रशियाचे राष्ट्रपती साहाय्यक निकोलाईंनी दिली भेट

IFFI 2025: 'गोव्यात या, चित्रीकरण करा'! CM सावंतांचे आवाहन; राज्‍याला चित्रपट निर्मिती हब बनवण्‍याचे स्‍वप्‍न

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर मोठा फेरबदल! 34 पोलिस निरीक्षक, 6 उपअधीक्षकांच्या बदल्या; उत्तर गोव्याचे अधीक्षक राहुल गुप्ता यांचीही उचलबांगडी

Horoscope: महत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या; घाई करू नका! महत्वाचे निर्णय इतरांना सांगू नका.. वाचा तुमच्या राशीचे भविष्य

SCROLL FOR NEXT