Jammu Kashmir Dainik Gomantak
देश

Jammu Kashmir: '...हल्ला आधीच नियोजित होता?'

जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) अनंतनागमधील काही दगडफेकीच्या घटना वगळता संपूर्ण खोऱ्यात ईद-उल-फित्रची नमाज शांततेत अदा करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमधील काही दगडफेकीच्या घटना वगळता संपूर्ण खोऱ्यात ईद-उल-फित्रची नमाज शांततेत अदा करण्यात आली. यादरम्यान लोकांनी कोरोना महामारीपासून पूर्णपणे मुक्ती मिळवण्यासाठी विशेष प्रार्थना केली. मात्र, अनंतनागमधील (Anantnag) मशिदीबाहेर ईदची नमाज अदा केल्यानंतर काही उपद्रवींनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली. विशेष म्हणजे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. (Stones were hurled at a convoy of police outside a mosque in Anantnag, Jammu and Kashmir)

दरम्यान, दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील जंगलेट मंडी भागातील जामिया मशिदीत ईदच्या नमाजच्या वेळी काही उपद्रवी घटकांनी जामिया मशिदीभोवती तैनात असलेल्या जम्मू-काश्मीर पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली. मात्र, पोलिसांनी वेळीच या घटनेवर नियंत्रण मिळवले. जामिया हनफिया मशिदीबाहेर जम्मू-काश्मीर पोलिसांची टीम तैनात होती. या पथकावर काही उपद्रवी घटकांनी दगडफेक करुन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला मात्र ते पळून गेले.

सकाळी नमाज अदा करण्याची मागणी केली होती

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही मिनिटांतच परिस्थिती नियंत्रणात आली. यानंतर परिसरात परिस्थिती सामान्य झाली आहे. त्यानंतर इतर मुस्लिम बांधवही नमाज पढून निघून गेले. अशीच काहीशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता पाहता पोलिसांसह श्रीनगर प्रशासनाने यापूर्वीच श्रीनगरमधील (Srinagar) जामिया मशीद आणि इदगाहमध्ये सकाळी नमाज अदा करण्याची मागणी केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या अंजुमनने जामिया मशीद आणि इदगाहमध्ये पुन्हा नमाज न अदा करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

राजस्थानमध्येही ही घटना समोर आली

मागील काही दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) दगडफेकीची कोणतीही मोठी घटना घडलेली नाही. दुसरीकडे मात्र, देशाच्या इतर काही भागांतून ईदच्या दिवशी हाणामारी झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. राजस्थानच्या जोधपूरमध्ये दोन समुदायांमध्ये हाणामारी झाली आहे. सोमवारी रात्री जोधपूरच्या जालोरी गेटवर दोन गट समोरासमोर आले. यानंतर रात्री दगडफेक करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: तांत्रिक अडचणीमुळे फ्लाय91 पुणे-गोवा सकाळच्या विमान उड्डाणाला विलंब

GIDC:‘आयडीसी’च्या संचालकांवर गुन्हे नोंदवा! फेरेरांची मागणी; वित्तीय शिस्त न पाळल्याचा ठेवला ठपका

Ferry Boat Repair: फेरीबोटींवर 35 कोटींपेक्षा अधिक खर्च! आकडेवारीत विसंगती असल्याचा दावा; युरी-फळदेसाई यांच्यात जुंपली

Goa Politics: खरी कुजबुज; गोव्यातील ठेकेदार सुटले कसे?

Dharbandora: 'हे आदिवासी संस्कृतीचा कणा असलेले जंगल, इथे IIT नको'! धारबांदोडा ग्रामस्थ ठाम; भूसंपादनास तीव्र आक्षेप

SCROLL FOR NEXT