Protest at Yediyurappa House  Dainik Gomantak
देश

Yediyurappa: कर्नाटकात येडियुरप्पा यांच्या घरावर दगडफेक; आरक्षणावरून बंजारा, भोवी समाज आक्रमक

राज्य सरकारने एससी प्रवर्गात पाडले चार गट

Akshay Nirmale

Yediyurappa: कर्नाटकात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोमवारी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. बंजारा आणि भोवी समाजातील लोकांनी येडियुरप्पा यांच्या शिवमोग्गा येथील घर आणि कार्यालयाबाहेर हिंसक निदर्शने केली. यानंतर परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.

अनुसूचित जातींना (एससी) देण्यात येणारे आरक्षण या वर्गातील विविध जातींमध्ये विभागले जाईल, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याला बंजारा आणि भोवी समाजाचा विरोध आहे. यामुळे त्यांच्या समाजातील लोकांवर अन्याय होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

बीएस येडियुरप्पा म्हणाले, 'बंजारा समाजाच्या नेत्यांमध्ये गैरसमज झाले आहेत. मी एक-दोन दिवसांत त्यांच्याशी बोलेन आणि त्यांना मुख्यमंत्र्यांकडेही घेऊन जाईन, जेणेकरून त्यांच्या तक्रारी सोडवता येतील. बंजारा समाजाच्या लोकांनी मला मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा दिला आहे.

मी एसपी आणि डीसी यांना कठोर कारवाई न करण्यास सांगितले आहे. या घटनेसाठी मी काँग्रेस किंवा इतर कोणालाही दोष देणार नाही.

24 मार्च रोजी राज्य सरकारने अनुसूचित जाती (SC) आरक्षणाचे 4 भाग केले. आता शेड्यूल कास्ट (लेफ्ट) 6%, शेड्यूल कास्ट (राईट) 5.5%, शेड्यूल कास्ट (टचेबल) 4.5% आणि शेड्यूल कास्ट (इतर) साठी 1% आरक्षण दिले जाईल.

कर्नाटकात शेड्यूल कास्ट अंतर्गत 101 जाती आहेत, ज्या या 4 श्रेणींमध्ये विभागल्या आहेत.

कर्नाटकच्या कायदामंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, लोकसंख्येच्या आधारावर हे आरक्षण देण्यात आले आहे. या चार श्रेणी कलम 341 (2) अंतर्गत तयार केल्या आहेत. राज्यघटनेच्या 9 व्या अनुसूचीमध्ये हा बदल समाविष्ट करण्यासाठी सरकारने केंद्र सरकारला शिफारस पाठवली आहे.

सरकारने एससी-एसटी प्रवर्गाच्या आरक्षणातही वाढ केली होती. अनुसूचित जातीचे आरक्षण 15 % वरून 17 % आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण 3% वरून 7 % करण्यात आले.

न्यायमूर्ती सदाशिव आयोगाच्या अहवालाच्या आधारे राज्य सरकारने हा निर्णय घेतला होता. या आयोगाने आपल्या अहवालात अनुसूचित जाती जमातींतर्गत येणाऱ्या जातींना आनुपातिक आरक्षण (प्रपोर्शनल रिझर्वेशन) देण्याचा सल्ला दिला होता.

हा निर्णय मागे घेण्याची मागणी बंजारा आणि भोवी समाजातील लोक करत आहेत. हा निर्णय शेड्यूल कास्टमधील जातींमध्ये फूट पाडेल, असा त्यांचा आरोप आहे. वास्तविक, बंजारा आणि भोवी जाती शेड्यूल कास्ट (स्पर्श करण्यायोग्य) अंतर्गत येतात. त्यांना 4.5 टक्के आरक्षण दिले आहे. पण आंदोलकांच्या मते ही टक्केवारी कमी आहे.

राज्य सरकारचा निर्णयाचा निषेध करण्यासाठी बंजारा आणि भोवी समाजातील हजारो लोक रस्त्यावर उतरले. आंदोलकांनी येडियुरप्पा आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे पोस्टरही जाळले. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला, आंदोलकांना पांगवण्यासाठी पाण्याचाही वापर केला. यावेळी एक पोलीस कर्मचारी जखमी झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT