Amit Shah Dainik Gomantak
देश

देशभर चर्चेत असणाऱ्या हिजाब वादावर अमित शहांनी सोडलं मौन

न्यायालयाने दिलेला निर्णय अपल्याला मान्य करावा लागेल: अमित शहा

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: देशातील हिजाबचा वादावर सध्या देशभर सुरू आहेत चर्चा सुरू आहेत. या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अपले परखड मत मांडले आहे. या मुलाखतीत गृहमंत्र्यांनी पहिल्यांदाच हिजाब (Hijab) वादावर आपले मत मांडले असुन ते म्हणाले की, त्यांच्या दृष्टीने शाळेचा ड्रेस कोड सर्व धर्माच्या लोकांनी पाळला पाहिजे. सध्या हे प्रकरण न्यायालयात असुन, न्यायालयाने दिलेला निर्णय आपण पाळला पाहिजे असे ते म्हणाले. (Statement of Amit Shah on Hijab controversy Argument)

ते पुढे म्हणाले, "शाळेचा ड्रेस कोड हा सर्व धर्माच्या लोकांनी स्वीकारला पाहिजे. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे, न्यायालयाने दिलेला निर्णय अपल्याला मान्य करावा लागेल. शाळांमध्ये मुलांना धर्मापेक्षा वरचढ ठेवायला हवे असे माझे वैयक्तिक मत आहे. कोर्टाने निर्णय दिला की आपण सर्वांनी त्याचे पालन केले पाहिजे. यात जर षडयंत्र असेल तर विरोधकांचे मनसुबे फसणार नाहीत. त्यात बरेच लोक सक्रिय आहेत. पण त्यांचा हेतू सफल होणार नाही. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर तो सर्वांनी स्वीकारावा." असे ते म्हणाले.

मुस्लिमांना तिकीट न देणे ही भाजपची मजबुरी आहे का?

मुस्लिमांना (Muslim) तिकीट न देणे ही भाजपची (BJP) मजबुरी आहे का? या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, "भारत सरकारचे जे नाते देशातील प्रत्येक नागरिकाशी असले पाहिजे तेच नाते भाजपचे मुस्लिमांशी आहे. पण निवडणुकीत कोणाला मतं पडतात, हेही पाहावं लागतं

हा राजकीय शिष्टाचार आहे. राज्यघटनेच्या आधारे सरकार चालते. सरकार हे देशातील जनतेने निवडले आहे. निवडणुका जिंकणेही महत्त्वाचे आहे. राज्यघटनेच्या आधारे सरकार चालते. आणि सरकार हे जनतेच्या मतांनी निवडले जाते. पण त्याच्या आधारावर जनतेत भेदभाव केला जात नाही."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT