state government cannot withdraw charges against MLAs and MPs without the permission of the High Court Dainik Gomantak
देश

गुन्हे दाखल असलेल्या आमदार, खासदारांना सुप्रीम कोर्टाचा झटका

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) केंद्र सरकारवर (Central Government) खासदार आणि आमदारांविरोधातील प्रलंबित प्रकरणांवरचे स्टेटस रिपोर्ट दाखल न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

दैनिक गोमन्तक

सर्वोच्च न्यायालयाने आज म्हटले आहे की, उच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय खासदार आणि आमदारांविरोधातील गुन्हेगारी खटले मागे घेतले जाणार नाहीत. संबंधित उच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय राज्य सरकार हे प्रकरणं मागे घेऊ शकणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. केरळमधील एका प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयानुसार उच्च न्यायालय या प्रकरणातील निकाल देणार आहे. न्यायालयाने असेही म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल यांनी त्यांच्या सरन्यायाधीशांना खासदार आणि आमदारांविरोधातील प्रलंबित तोडग्यांबाबत माहिती द्यावी. (State government cannot withdraw charges against MLAs and MPs without the permission of the High Court)

सीबीआय न्यायालये आणि इतर न्यायालये खासदार आणि आमदारांविरोधातील प्रलंबित खटल्यांची सुनावणी सुरू ठेवतील. खासदार आणि आमदारांविरोधातील गुन्हेगारी खटल्यांचा लवकरात लवकर निरवाळा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय एक विशेष खंडपीठ स्थापन करेल.

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर खासदार आणि आमदारांविरोधातील प्रलंबित प्रकरणांवरचे स्टेटस रिपोर्ट दाखल न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. सर न्यायाधीश एन.व्ही. रमन्ना म्हणाले की, आम्ही खासदार आणि आमदारांशी संबंधित प्रलंबित प्रकरणांमध्ये गंभीर होण्यासाठी केंद्र सरकारला सुरुवातीपासूनच विनंती केली होती, परंतु केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, तसेच ईडीचा स्टेटस रिपोर्ट पेपरमध्ये प्रसिद्ध केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

न्यायालयाने यावर ‘सर्व माध्यमांना प्रथम मिळतात, एजन्सी कोर्टाला काहीच देत नाही. ईडीचे प्रतिज्ञापत्र देखील फॉरमॅटमध्ये नाही आणि त्यात फक्त आरोपींची यादी आहे.’ असे म्हणच नाराजी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला स्टेटस रिपोर्ट दाखल करण्याची शेवटची संधी दिली असुन, दोन आठवड्यांच्या आत अहवाल दाखल करण्यास सांगितले आहे.

सुप्रीम कोर्टाने एमिक्स क्यूरी विजय हंसारिया यांच्या अहवालावर हा महत्वाचा निर्णय घेतला. या आहवालानुसार- यूपी सरकारला मुजफ्फरनगर दंगलीतील आरोपी भाजप आमदारांवरील 76 खटले मागे घ्यायचे आहेत. कर्नाटक सरकारला आमदारांवरील 61 खटले मागे घ्यायचे आहेत. उत्तराखंड आणि महाराष्ट्र सरकारलाही याच पद्धतीने खटला मागे घ्यायचा आहे. मात्र या निर्णयानंतर आता हे खटले आता सरकारला परस्पर मागे घेता येणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT