CUSAT Fest Accident Dainik Gomantak
देश

CUSAT Fest Accident: कोचीच्या CUSAT विद्यापीठात संगीत कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी; 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू

CUSAT Fest Accident: केरळमधील कोची येथील कुसॅट विद्यापीठात शनिवारी एका संगीत कार्यक्रमादरम्यान मोठा अपघात झाला.

Manish Jadhav

CUSAT Fest Accident: केरळमधील कोची येथील कुसॅट विद्यापीठात शनिवारी एका संगीत कार्यक्रमादरम्यान मोठा अपघात झाला. विद्यापीठात झालेल्या चेंगराचेंगरीत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, निकिता गांधी यांच्या कॉन्सर्ट दरम्यान हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठ (University) कॅम्पसमधील ओपन एअर ऑडिटोरियममध्ये संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, जखमींवर उपचारासाठी कलामसेरी वैद्यकीय महाविद्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे.

चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या चार विद्यार्थ्यांमध्ये 2 मुले आणि 2 मुली आहेत. तर दोन विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक विश्लेषणानुसार, जेव्हा पाऊस सुरु झाला तेव्हा मागच्या बाजूला असलेले विद्यार्थी समोरच्या दिशेने धावू लागले. त्याचदरम्यान चेंगराचेंगरी झाली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.

दरम्यान, अचानक पाऊस सुरु झाल्याने चेंगराचेंगरी झाल्याची माहिती विद्यापीठाच्या कुलगुरुंनी दिली. ते म्हणाले की, 'शुक्रवारी महोत्सवाला सुरुवात झाली. फेस्टचा एक भाग म्हणून अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार होते. याच क्रमाने आज संगीताचा कार्यक्रम सुरु होता. यावेळी शेजारील महाविद्यालयातील विद्यार्थीही कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. दुर्दैवाने गर्दी खूप वाढली. 2,000 हून अधिक लोक आत आले आणि पायऱ्यांवर धावू लागले.'

दुसरीकडे, कोची नगरपालिकेचे नगरसेवक प्रमोद यांनीही या घटनेबाबत निवेदन दिले आहे. एकाच गेटमधून प्रवेश आणि बाहेर पडल्याने चेंगराचेंगरी झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रमोद म्हणाले की, ''विद्यार्थी (Students) त्याच गेटमधून येण्याचा प्रयत्न करत होते. पायऱ्यांवरुन आत प्रवेश करणारे विद्यार्थी आधी पडले आणि नंतर गेटवर असलेल्या प्रचंड गर्दीने त्यांना चिरडले.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT