Chandrababu Naidu Dainik Gomantak
देश

Andhra Pradesh: चंद्राबाबू नायडू यांच्या रोड शोदरम्यान चेंगराचेंगरी, 8 जणांचा मृत्यू

Chandrababu Naidu: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू यांच्या रोड शोदरम्यान चेंगराचेंगरी झाली.

दैनिक गोमन्तक

Chandrababu Naidu: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगु देसम पार्टीचे (टीडीपी) सुप्रीमो चंद्राबाबू नायडू यांच्या रोड शोमध्ये मोठा अपघात झाला. ज्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. चंद्राबाबू नायडू बुधवारी संध्याकाळी कंदुकुरमध्ये रोड शो करत होते. त्यांचा ताफा गुडम सांडपाणी कालवा ओलांडत असताना अनेक लोक कालव्यात पडले. त्यामुळे तीन जणांचा गुदमरुन जागीच मृत्यू झाला तर दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. तर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे, तर 6 जणांवर उपचार सुरु आहेत, जे धोक्याबाहेर आहेत.

दुसरीकडे, चंद्राबाबू नायडू 28 ते 30 डिसेंबर दरम्यान नेल्लोर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते जिल्ह्यातील कंडुकूर, कावली आणि कोवूर मतदारसंघातील विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नुकतेच कंडुकूर येथे मांडौस चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी (Farmer) ते संवाद साधणार आहेत. यादरम्यान ते विविध भागात रोड शोही करत आहेत.

तसेच, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. चंद्राबाबू नायडू यांनी घटनेनंतर लगेचच कार्यक्रम थांबवला आणि मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT