Ditwah Cyclone Daininik Gomantak
देश

Ditwah Cyclone: श्रीलंकेत 123 बळी घेतल्यानंतर 'दित्वा' चक्रीवादळाची भारताच्या दिशेने वाटचाल; किनारी राज्यांना हाय अलर्ट VIDEO

Ditwah Cyclone Trajectory: ‘दित्वा’ नावाचे हे चक्रीवादळ श्रीलंकेमध्ये मोठी हानी केल्यानंतर आता भारताच्या चार राज्यांच्या दिशेने वेगाने सरकत आहे.

Manish Jadhav

Ditwah Cyclone Trajectory: दक्षिण भारतात आणखी एका शक्तिशाली चक्रीवादळाची दहशत पसरली आहे. ‘दित्वा’ नावाचे हे चक्रीवादळ श्रीलंकेमध्ये मोठी हानी केल्यानंतर आता भारताच्या चार राज्यांच्या दिशेने वेगाने सरकत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने या राज्यांसाठी ‘हाय अलर्ट’ जारी केला.

आशियात चक्रीवादळाचे थैमान

दित्वा चक्रीवादळामुळे दक्षिण-पूर्व आशियातील तीन देशांमध्ये अभूतपूर्व पूर आणि विध्वंस झाला. थायलंड, इंडोनेशिया आणि श्रीलंका या देशांमध्ये चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले. या देशांमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे 500 हून अधिक लोकांच्या मृत्यूची नोंद झाली. सुमारे 50 लाखांहून अधिक लोक रस्त्यावर आले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. नोव्हेंबर महिना संपत असतानाही हवामानाचा प्रकोप कमी होत नसून, त्याचे गंभीर परिणाम जगभर दिसून येत आहेत.

भारतातील राज्यांकडे चक्रीवादळाची वाटचाल

श्रीलंकेत कमीतकमी 123 लोकांचा बळी घेतल्यानंतर आता हे चक्रीवादळ दक्षिण भारताच्या किनाऱ्याकडे वाटचाल करत आहे. भारतीय हवामान विज्ञान विभागाच्या अंदाजानुसार, दित्वा चक्रीवादळ उत्तर-उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकत आहे. हे चक्रीवादळ 30 नोव्हेंबरपर्यंत बंगालच्या उपसागराच्या नैऋत्येकडील भागात, उत्तर तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि त्याला लागून असलेल्या दक्षिण आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांमध्ये अतिवृष्टी आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.

तामिळनाडूमध्ये हाय अलर्ट आणि सेवा प्रभावित

चक्रीवादळाच्या आगमनामुळे आणि पुढील 48 तासांत अतिवृष्टी आणि सोसाट्याच्या वाऱ्याच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार, तामिळनाडूमध्ये जनजीवन प्रभावित झाले. तामिळनाडूमध्ये अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेऊन अनेक शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, चेन्नई विमानतळ प्राधिकरणाने 54 निर्धारित विमानांच्या सेवा रद्द केल्या आहेत. यामध्ये शनिवार सकाळपासून रात्रीपर्यंतच्या एटीआर-प्रकारच्या प्रादेशिक टर्बोप्रॉप विमानांचा समावेश आहे. मदुराई, तिरुचिरापल्ली, थूथुकुडी, सेलम, बंगळूरु, हैदराबाद आणि जाफना यांसारख्या ठिकाणांसाठीच्या विमानांचे उड्डाण आणि आगमन दोन्ही रद्द करण्यात आले.

प्रवाशांना सूचना

विमान कंपन्यांनी प्रवाशांना शेवटच्या क्षणी विमानतळावर जाण्याचे टाळण्याचा सल्ला दिला आहे. चक्रीवादळी वारे आणि मुसळधार पाऊस यामुळे निर्माण होणारे धोके लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

भारताकडून श्रीलंकेला मदत

दरम्यान, चक्रीवादळ ‘दित्वा’मुळे श्रीलंकेत झालेल्या विध्वंसानंतर भारतीय नौदल युद्धपातळीवर मदतकार्य करत आहे. भारतीय नौसेना आणि श्रीलंका वायुसेना एकत्रितपणे शोध आणि बचाव अभियानात मदत करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT