Dhirendra Shastri
Dhirendra Shastri Dainik Gomantak
देश

Dhirendra Shastri: धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात बोलणं काश्मीरी युवकाला पडलं महागात, पोलिसांनी नोंदवला FIR

Manish Jadhav

Bajrang dal FIR on Waqar Bhatti: बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री आपल्या वक्तव्यांमुळे आणि दैवी दरबारामुळे अनेकदा चर्चेत असतात. यातच आता, धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात बोलल्याप्रकरणी एका काश्मिरी कार्यकर्त्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रीय बजरंग दलाच्या जम्मू-काश्मीर युनिटचे प्रमुख राकेश कुमार यांच्या तक्रारीवरुन वकार भाटीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, वकार भाटीवर भारतीय दंड संहिता (IPC) कलम 295 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाटीने धीरेंद्र शास्त्री यांच्याबाबत बोलताना अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप राकेश कुमार यांनी केला आहे.

मीडियाशी बोलताना स्टेशन प्रभारी नीरज चौधरी यांनी सांगितले की, वकार भाटीविरुद्ध आयपीसी कलम 295 ए अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

बिहारमध्ये धीरेंद्र शास्त्री यांच्या कथेवरुन गदारोळ

अलीकडेच, पटणा येथे धीरेंद्र शास्त्री यांच्या पाच दिवसीय कथेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यासाठी सर्व राजकीय पक्ष एकमेकांसमोर आले होते.

येथे भाजपचे (BJP) खासदार मनोज तिवारी आणि गिरीराज सिंह यांच्यासह भाजपचे इतर नेते धीरेंद्र शास्त्री यांच्या स्वागतासाठी पाटणा विमानतळावर पोहोचले होते. त्याचवेळी, भाजपच्या विरोधी पक्षांनी अप्रत्यक्षपणे धीरेंद्र शास्त्रींवर टीकास्त्र डागले होते.

कोण आहेत धीरेंद्र शास्त्री?

सध्या सोशल मीडियावर (Social Media) धीरेंद्र शास्त्री यांचे नाव खूप चर्चिले जात आहे. धीरेंद्र शास्त्री अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे आणि दैवी दरबारामुळे चर्चेत असतात. ते असा दावा करतात की, ते न बोलता लोकांचे मन जाणून घेऊ शकतात.

महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप केल्यावर मीडियाचा कॅमेरा पहिल्यांदाच धीरेंद्र शास्त्री यांच्याकडे वळला होता. धीरेंद्र शास्त्री यांचे कोणतेही कर्तृत्व नाही, असा दावा श्याम मानव यांनी केला होता.

याशिवाय, श्याम मानव यांनी धीरेंद्र शास्त्री यांना आव्हानही दिले होते. श्याम मानव हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती (ABANS) चे संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक देखील आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT