Vijay Deverakonda Dainik Gomantak
देश

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

Vijay Deverakonda Accident Video: साऊथ सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावला.

Manish Jadhav

Vijay Deverakonda Accident Video: साऊथ सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावला. आंध्र प्रदेशातील पुट्टापर्थी येथून हैदराबादला जात असताना एका अज्ञात वाहनाने विजयच्या कारला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत विजयच्या कारचे मोठे नुकसान झाले. या अपघातात तो थोडक्यात बचावला. धडक दिल्यानंतर अपघातग्रस्त वाहन न थांबता तडक निघून गेले. या घटनेनंतर विजयच्या चालकाने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

तेलंगणामध्ये घडला अपघात

न्यूज एजन्सी पीटीआयच्या वृत्तानुसार, विजय देवरकोंडाची कार तेलंगणातील जोगुलम्बा गडवाल जिल्ह्याजवळ अपघाताची (Accident) शिकार झाली. पुट्टापर्थीहून हैदराबादला परतत असताना हा अपघात झाला. एका कारने विजयच्या कारला मागून धडक दिली, ज्यामुळे त्याच्या कारचा काही भाग क्षतिग्रस्त झाला. हा अपघात दुपारी साधारण 3 वाजता घडला. व्हिडिओ फुटेजमध्ये दिसत आहे की, विजय देवरकोंडा प्रवास करत असताना अचानक एक कार उजव्या बाजूला वळली आणि त्याच्या कारच्या डाव्या बाजूला धडकली. या अपघातात विजय आणि त्याचा चालक दोघेही सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.

नुकसान झालेल्या कारचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर विजय देवरकोंडाच्या अपघातग्रस्त कारचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये कारच्या डाव्या भागाला झालेले मोठे नुकसान स्पष्टपणे दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारचे (Car) नुकसान झाले असले तरी, विजय देवरकोंडा आणि त्याच्या चालकाला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. चालकाने तक्रार दाखल केल्यानंतर, धडक देऊन पळून गेलेल्या अज्ञात वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत.

रश्मिका मंदान्नासोबत साखरपुढ्याची चर्चा

एकिकडे हा अपघात घडला असताना, दुसरीकडे विजय देवरकोंडा अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबत झालेल्या साखरपुढ्यामुळे चर्चेत आहेत. वृत्तपत्रानुसार, 3 ऑक्टोबर रोजी दोघांनी कुटुंबाच्या आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत साखरपुडा (Engagement) केला आहे. मात्र, दोघांकडूनही याबद्दल अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, विजय देवरकोंडा नुकताच 'किंगडम' (Kingdom) या चित्रपटात दिसला होता, जो आता ओटीटीवरही हिट होत आहे. तर, रश्मिका मंदान्ना लवकरच आयुषमान खुरानासोबत 'थम्मा' (Thamma) या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

Border 2 Teaser: 'लाहोरपर्यंत आवाज गेला पाहिजे...' पाकिस्तानला धडकी भरवणारा बॉर्डर 2 चा टीझर रिलीज; देओलचा रुद्र अवतार पाहून व्हाल अवाक VIDEO

SCROLL FOR NEXT