AUS vs SA 2nd T20 Dainik Gomantak
देश

AUS vs SA 2nd T20: दक्षिण आफ्रिकेची ऑस्ट्रेलियावर 'विराट' मात! मोडला आपलाच रेकॉर्ड; गोलंदाजांनी बजावली महत्त्वाची भूमिका

South Africa Record: दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला 53 धावांनी पराभूत केले. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

Manish Jadhav

South Africa Record: डेवाल्ड ब्रेव्हिसच्या वादळी शतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला 53 धावांनी पराभूत केले. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. डेवाल्ड ब्रेव्हिस हा विजयाचा खरा शिल्पकार ठरला, ज्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर संघाला एक मोठी धावसंख्या उभारुन दिली.

दक्षिण आफ्रिकेची विक्रमी कामगिरी

दरम्यान, नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने (South Africa) 20 षटकांत 218 धावांचा डोंगर उभारला. डेवाल्ड ब्रेव्हिसने या डावात दमदार फलंदाजी केली. त्याने अवघ्या 41 चेंडूत शतक ठोकले. ब्रेव्हिसने 125 धावांची विस्फोटक खेळी खेळली. आपल्या या खेळीत त्याने 12 चौकार आणि 8 गगनचुंबी षटकार लगावले. ब्रेव्हिसला ट्रिस्टन स्टब्सने 31 धावांची उपयुक्त खेळी खेळून चांगली साथ दिली. या मोठ्या धावसंख्येपुढे ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले.

ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अपयशी

त्याचवेळी, 219 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा (Australia) संघ पूर्णपणे ढेपाळला. केवळ टिम डेविड वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. डेव्हिडने 24 चेंडूंमध्ये 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने अर्धशतक (50 धावा) झळकावले, मात्र तो बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा मावळल्या. कर्णधार मिचेल मार्श (22), ग्लेन मॅक्सवेल (16), आणि एलेक्स कॅरी (26) हे मोठे फलंदाज अपयशी ठरले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 20 षटकेही खेळू शकला नाही आणि 165 धावांवर गारद झाला.

दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा यशस्वी मारा

फलंदाजांबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनीही या विजयात मोलाची भूमिका बजावली. क्वेना मफाका आणि कॉर्बिन वॉश यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले. तर, कागिसो रबाडा, एडन माक्ररम आणि लुंगी एनगिडी यांनीही प्रत्येकी एक विकेट घेत ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. या 53 धावांच्या विजयासह दक्षिण आफ्रिकेने टी-20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात मोठ्या फरकाने विजय मिळवण्याचा आपलाच विक्रम मोडला. याआधी त्यांनी 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाला 21 धावांनी हरवले होते. या शानदार कामगिरीसाठी डेवाल्ड ब्रेव्हिसला सामनावीर (Player of the Match) पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Har Ghar Tiranga: हर घर तिरंगा! गोव्यात मंत्री, राजकीय नेत्यांनी घरी फडकवला भारतीय ध्वज

Goa Beef Shortage: गोव्यात सलग दहाव्या दिवशीही 'बीफ'ची टंचाई कायम, व्यापारी आक्रमक; मुख्यमंत्र्यांना निवेदन

Bhumi Pednekar: भूमी पेडणेकरचं 'गोवा व्हेकेशन'! मित्रांसोबत घेतेय सुट्ट्यांचा आनंद; स्टायलिश आणि बोल्ड अंदाजातील फोटो केले शेअर

Left Handers Day: प्राणी, पक्षी डावखुरे असतात काय? एखाद्याला प्रशिक्षित करून डावखुरा करणे शक्य आहे का?

Goa Live News: बांदोडा येथील बूथ क्रमांक २३ मधील सर्व ११९ मतदार हे सनातन आश्रमचे साधक

SCROLL FOR NEXT