Manish Jadhav
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली कांगारुंनी दुसरा कसोटी सामन्यात जबरदस्त कमबॅक केलं. मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली असून अजून तीन सामने शिल्लक आहे.
पिंक बॉल टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताची दाणादाण उडवली आणि 1031 चेंडूतच सामना संपवला. दोन्ही संघातील हा सर्वात छोटा सामना आहे.
ऑस्ट्रेलियाने या विजयासह कसोटी क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. दोन्ही संघांमधील सर्वात लहान कसोटी सामना असेल. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने टीम इंडियाविरुद्ध केवळ 486 चेंडू टाकले.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या आणि दुसऱ्या डावातील षटकात टाकलेल्या चेंडूंची बेरीज केली तर 486 टाकले.
भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील 2012 मध्ये पर्थ कसोटी सामना 1200 चेंडूत संपला होता. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात हा सलग चौथा पराभव आहे.
ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 13 डे नाईट सामने खेळले आहेत. त्यापैकी 12 सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे.