Rahul Gandhi Twitter/ @INCIndia
देश

"मां.. मेरी मां...,'' 'भारत जोडो' यात्रेत Rahul Gandhi बनले श्रावणबाळ; काँग्रेसने केले ट्विट

Congress president Sonia Gandhi: हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मां'.

दैनिक गोमन्तक

Bharat Jodo Yatra: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी कर्नाटकातील मंड्या येथे 'भारत जोडो यात्रे' त सहभागी होऊन राहुल गांधी आणि इतर 'भारत यात्रीं 'सोबत पदयात्रा काढली. यादरम्यान राहुल गांधी आई सोनिया गांधी यांच्या बुटाची लेस बांधताना दिसले. काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मां'.

दरम्यान, सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी मंड्या जिल्ह्यातील डाक बंगला भागातून पदयात्रेला सुरुवात केली. त्या पहिल्यांदाच 'भारत जोडो यात्रे'मध्ये सामील झाल्या आहेत. कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी सोनियांची मंड्यातील पदयात्रा ही देवेगौडा कुटुंबीयांसाठी भाग्यशाली मानली जात आहे.

दुसरीकडे, काँग्रेसचे (Congress) सरचिटणीस के.सी वेणुगोपाल म्हणाले की, "सोनिया गांधी या यात्रेत सामील झाल्या, हा ऐतिहासिक क्षण आहे. यामुळे कर्नाटकात पक्ष आणखी मजबूत होईल.''

तसेच, तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून राहुल गांधींनी 'भारत जोडो यात्रे'चा शुभारंभ केला. सध्या ही यात्रा कर्नाटकातून प्रवास करत आहे. या यात्रेचा समारोप पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला काश्मीरमध्ये होईल. या यात्रेत एकूण 3,570 किमी अंतर कापले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: २५ ऑक्टोबरच्या अखेरीस गोवा वॉटर मेट्रो प्रकल्पाला विशेष मदत करण्याचे आश्वासन

Goa Water Metro: 'वॉटर मेट्रो' सुरू करण्यासाठी मंत्री फळदेसाई केरळ दौऱ्यावर, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनावाल यांची घेणार भेट

Mashel Panchayat: माशेलात उपसरपंच बदलाचा खेळ, की लोकशाहीची थट्टा? राजकीय नाट्य शिगेला; तीन तासांत अविश्‍वास ठराव

Goa Chaturthi Market: डिचोलीच्या बाजारात माटोळीच्या खरेदीसाठी झुंबड, राज्यात गणेशोत्सवाचे वातावरण!

PM Modi Degree Controversy: मोदींची पदवी गुलदस्त्यातच, दिल्ली हायकोर्टाने CIC चा आदेश केला रद्द

SCROLL FOR NEXT