Crime News Dainik Gomantak
देश

Madhya Pradesh Crime: माणुसकीला काळीमा! आईच्या मृत्यूनंतर मुलाने केले घृणास्पद कृत्य; पोलिस म्हणाले...

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. इथे एका 70 वर्षीय महिलेच्या मृतदेहावर बलात्कार केल्याप्रकरणी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाने सार्वजनिक ठिकाणी बलात्कार केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. पोलिसांनी सांगितले की, मृत महिलेच्या मुलाने तिच्यावर दोनदा बलात्कार केला. ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी मुलाला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले.

दरम्यान, या प्रकरणाची माहिती देताना पलासिया पोलीस ठाण्याचे प्रभारी जगदीश प्रसाद जामरे यांनी सांगितले की, बाडी ग्वालटोली परिसरातील एका गल्लीत 22 वर्षीय तरुणाने आपल्या 70 वर्षीय आईच्या मृतदेहावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. 1 आणि 2 डिसेंबरच्या रात्री मुलाने हे घृणास्पद कृत्य केले. जामरे यांनी पुढे सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले असता त्यांना तो मानसिकदृष्ट्या ठीक नसल्याचे समजले. या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, वृद्ध महिलेला फुफ्फुसाच्या आजारामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिला शासकीय महाराजा यशवंतराव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्या मृत्यूनंतर तिच्या मुलाने तिचा मृतदेह रुग्णालयातून नेला. स्टेशन प्रभारींनी सांगितले की, वृद्ध महिलेच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

दुसरीकडे, या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 297 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करणार्‍या आणखी एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, घटनास्थळाजवळील वसतिगृहात राहणाऱ्या दोन विद्यार्थिनींनी एका वृद्ध महिलेच्या मृतदेहावर तिच्याच मुलाने केलेल्या कथित बलात्काराचा व्हिडीओ बनवून पोलिसांना माहिती दिली होती. माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT