Accused
Accused Dainik Gomantak
देश

Video: 3 तरुणांवर अज्ञातांकडून हल्ला, व्हिडिओ व्हायरल होताच...

Manish Jadhav

Gurugram: गुरुग्रामच्या सेक्टर 59 मधून मारहाणीची घटना समोर आली आहे. येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या तीन तरुणांवर अज्ञातांनी हल्ला केला.

तरुणांना लाठ्या-काठ्यांनी जोरदार मारहाण करण्यात आली आणि गाडीचीही तोडफोड करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही बाब 8 मार्च म्हणजेच होळीची असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत 4 आरोपींना अटक केली आहे.

काठ्या, लोखंडी रॉडने कार थांबवून तरुणांवर हल्ला

ही घटना गुरुग्राममधील सेक्टर 59 मधील असल्याचे पोलिसांनी सांगितले. येथे अंकित, आकाश आणि रोहतास नावाचे तीन मित्र एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. कार्यक्रम आटोपून हे तिघे परत जात असताना काही अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला.

पीडित तरुणांपैकी अंकित याने पोलिसांना (Police) सांगितले की, कार्यक्रम आटोपून ते परतत असताना एका फॉर्च्युनर गाडीने त्यांच्या वाहनाला धडक दिली. यानंतर एकामागून एक 3 वाहने आली आणि त्यांनी त्याच्या गाडीलाही धडक दिली.

अंकितच्या म्हणण्यानुसार, त्याने वाहनातून पळून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी ओव्हरटेक करुन त्याची गाडी थांबवली आणि काठ्या आणि लोखंडी रॉडने आकाशवर हल्ला केला.

तरुणाची प्रकृती चिंताजनक, दिल्ली एम्समध्ये दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकित, आकाश आणि रोहतास हे दिल्लीतील (Delhi) फतेहपूर बेरी भागातील रहिवासी आहेत. अंकितच्या म्हणण्यानुसार, तो आरोपीला ओळखत नाही आणि आरोपींनी आपल्यावर का हल्ला केला याचीही माहिती नाही.

दुसरीकडे, व्हिडिओ व्हायरल होताच, गुरुग्राम पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल केला आणि चार आरोपींना अटक केली. विकास, अंकित, अरुण आणि राकेश अशी अटक आरोपींची नावे आहेत.

तसेच, गुरुग्राम पोलिसांनी अटक आरोपींसोबत काळ्या रंगाची क्रेटा कारही जप्त केली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये ही काळ्या रंगाची क्रेटा कारही स्पष्टपणे दिसत आहे. या संपूर्ण घटनेत आकाशला सर्वाधिक दुखापत झाली असून आकाशवर दिल्लीतील एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT