Smriti Mandhana Wedding Dainik Gomantak
देश

Smriti Mandhana Wedding: आधी वडिलांना हृदयविकाराचा झटका, आता होणाऱ्या नवऱ्याचीही तब्येत बिघडली; रुग्णालयात उपचार सुरू

Smriti Mandhana Wedding Update: विश्वविजेत्या स्मृती मानधना हिचे लग्न पुढे ढकलण्यात आले आहे. क्रिकेटपटूच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने लग्न पुढे ढकलण्यात आले.

Sameer Amunekar

विश्वविजेत्या स्मृती मानधना हिचे लग्न पुढे ढकलण्यात आले आहे. क्रिकेटपटूच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने लग्न पुढे ढकलण्यात आले. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे आज लग्न होणार होते. लग्नाचे विधी मोठ्या थाटामाटात साजरे होत होते. या जोडप्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले. दरम्यान आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आलीय.

स्मृती मानधना होणारा पलाश मुच्छलची तब्बेत बिघडल्याची माहिती समोर आलीय. व्हायरल इन्फेक्शन आणि पित्त वाढल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. उपचार घेतल्यानं त्याची तब्बेत आता बरी आहे.

याआधी, भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधनाचे व्यवस्थापक तुहिन मिश्रा यांनी पुष्टी केली आहे की तिचे वडील आजारी आहेत आणि लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. मेहंदी आणि हळदीचे समारंभ शनिवारी झाले. हे जोडपे आज दुपारी लग्न करणार होते. परंतु, तिच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली.

स्मृती मानधनाच्या व्यवस्थापकाने सांगितले की, "सकाळी मानधनाचे वडील नाश्ता करत असताना त्यांची प्रकृती बिघडू लागली. आम्ही थोडा वेळ वाट पाहिली. पण जेव्हा त्यांची प्रकृती सुधारली नाही, तेव्हा आम्ही धोका पत्करण्याचा निर्णय घेतला नाही आणि त्यांना रुग्णालयात नेले. सध्या ते निरीक्षणाखाली आहेत."

स्मृती मानधना त्या संघाचा भाग होती ज्याने २ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेला हरवून पहिल्यांदा महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. मानधना यांची फलंदाजीही विश्वचषकात उत्कृष्ट होती. अंतिम सामन्यात तिने शफाली वर्मासोबत शतकी भागीदारी केली. विजयानंतर पलाश मुच्छल मानधनासोबत क्रिकेट मैदानावर आनंद साजरा करताना दिसली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT