भारतीय महिला क्रिकेट संघाची आघाडीची फलंदाज स्मृती मानधना सध्या उत्तम फॉर्ममध्ये असून, तिने श्रीलंकेविरुद्ध तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात शानदार शतक झळकावत ११६ धावांची खेळी केली. तिच्या या दमदार कामगिरीमुळे भारताने निर्णायक सामना जिंकत मालिकाही आपल्या नावावर केली.
या विजयात मानधनाने महत्त्वाची भूमिका बजावली. तिच्या अचूक आणि आक्रमक फलंदाजीमुळे भारतीय संघाला चांगली धावसंख्या उभारता आली. या कामगिरीचा मानधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावरही फायदा झाला असून, आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत तिनं झेप घेतली आहे
आयसीसी महिला एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत स्टार फलंदाज स्मृती मानधना एका स्थानाने पुढे सरकली आहे. ती आता एकदिवसीय फलंदाजीच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. तिचे ७२७ रेटिंग गुण आहेत. २०१९ मध्ये ती नंबर-१ स्थानावर पोहोचली होती. श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या मालिकेत तिने पाच डावात २६४ धावा केल्या होत्या.
पहिल्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोल्वार्ड आहे. तिचे सध्या ७३८ रेटिंग गुण आहेत. भारत आणि श्रीलंकेविरुद्धच्या तिरंगी मालिकेत तिला फक्त ८६ धावा करता आल्या. श्रीलंकेची कर्णधार चामारी अटापट्टूने आपले अव्वल स्थान मजबूत केले.
तिरंगी मालिकेत १३९ धावा काढल्यानंतर ती दोन स्थानांनी पुढे सरकत सातव्या स्थानावर पोहोचली आहे. भारताची जेमिमा रॉड्रिग्ज पाच स्थानांनी प्रगती करत १५ व्या स्थानावर आलीय. तर दक्षिण आफ्रिकेची क्लोई ट्रायॉन नऊ स्थानांनी प्रगती करत १८ व्या स्थानावर आलीय.
तिरंगी मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झालेल्या भारतीय फिरकी गोलंदाज स्नेहा राणाला गोलंदाजांच्या क्रमवारीत फायदा झाला आहे. त्याने तिरंगी मालिकेत १४ च्या सरासरीने १५ विकेट्स घेतल्या.
यामुळे ती चार स्थानांनी पुढे सरकून ३४ व्या स्थानावर पोहोचली आहे. तिचे सध्या ४४० रेटिंग गुण आहेत. इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन अव्वल स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज नॅडिन डी क्लार्क एका स्थानाने पुढे जाऊन २४ व्या स्थानावर आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.