Smriti Irani Dainik Gomantak
देश

Video: राहुल गांधींच्या फ्लाइंग किसवरुन लोकसभेत गदारोळ, स्मृती इराणींच्या आरोपानंतर...

लोकसभेत बुधवारी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान वादंग निर्माण झाला.

Manish Jadhav

Smriti Irani Attacks Rahul Gandhi: लोकसभेत बुधवारी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान वादंग निर्माण झाला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आरोप केला की, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सभागृहातून बाहेर पडताना असभ्य वर्तन केले, ज्याबद्दल त्यांनी माफी मागावी.

स्मृती यांनी आरोप केला की, जेव्हा महिला सभागृहात बसल्या होत्या, तेव्हा त्यांनी 'फ्लाइंग किस'चा इशारा करत अत्यंत अशोभनीय वर्तन केले.

आपल्या भाषणात स्मृती इराणी म्हणाल्या की, सभागृहात म्हणणे मांडण्याचा अधिकार ज्यांना देण्यात आला, त्यांनी तेथून निघताना अशोभनीय वर्तन केले. महिला खासदार सभागृहात बसलेल्या असताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हे अशोभनीय वर्तन केले.

स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी हल्लाबोल करत म्हटले की, ही त्या कुटुंबाची संस्कृती दर्शवते, जी आज देशानेही पाहिली आहे. इराणी यांच्या आरोपानंतर सभागृहात गदारोळ झाला, एवढेच नाही तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांच्याविरोधात 22 महिला खासदारांनी तक्रारही दाखल केली आहे.

दरम्यान, अविश्वास प्रस्तावाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सभागृहात चर्चेला सुरुवात केली.

सुमारे अर्ध्या तासाच्या भाषणात राहुल गांधींनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला, मोदी सरकारने मणिपूरमध्ये भारताची हत्या केली, ही भारतमातेची हत्या असल्याचा आरोप राहुल यांनी केला. राहुल यांच्या आरोपांवरुन सभागृहात प्रचंड गदारोळ झाला.

प्रत्युत्तरात स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि छत्तीसगडच्या मुद्द्यावरुन कॉंग्रेसला घेरले.

काँग्रेसचे लोक जम्मू-काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याबाबत चर्चा करतात, मात्र घोटाळ्यांवर मौन बाळगतात, अशा स्थितीत राहुल गांधी या मुद्यांवर का बोलत नाहीत, असा आरोप स्मृती यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT