Sampark Kranti Express Dainik Gomantak
देश

Sampark Kranti Express मधून धुराचे लोट; हजारो प्रवाशांनी भरलेली ट्रेन काही मिनिटांतच रिकामी

Sampark Kranti: हा प्रकार समजताच तातडीने इमर्जन्सी ब्रेक लावून ट्रेन थांबवण्यात आली. काही मिनिटांत ट्रेन पूर्णपणे रिकामी झाली.

Ashutosh Masgaunde

Smoke Billows From Sampark Kranti Express: शनिवारी सकाळी दरभंगाहून नवी दिल्लीला जाणाऱ्या ट्रेन क्रमांक १२५६५ बिहार संपर्क क्रांती सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या दरभंगा ते थलवारा हयाघाट रेल्वे मार्गावर ट्रेनच्या बोगीखाली असलेल्या चाकांजवळ धुराचे लोट उठल्याने प्रवाशांमध्ये भीती पसरली.

प्रवाशांनी याची माहिती रेल्वे चालकाला दिली. त्यामुळे तातडीने इमर्जन्सी ब्रेक लावून ट्रेन थांबवण्यात आली. काही मिनिटांत ट्रेन पूर्णपणे रिकामी झाली.

यावेळी प्रत्येकजण आपापल्या बोगीतून बाहेर पडत धुराच्या वाढत्या ज्वाळांकडे पाहत होता. जीआरपी आणि आरपीएफचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पुढीक कारवाई सुरू केली.

यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरक्षा दलांनी इंजिनच्या बाजूने चौथ्या बोगीखाली उठणारा धूर कसातरी आटोक्यात आणला. यानंतर गाडी पुढील स्थळी रवाना करण्यात आली.

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, ट्रेनमध्ये आग लागली नाही. ब्रेक बाइंडिंगमधून धूर निघत होता. यादरम्यान मार्गावर परिणाम झाल्यामुळे सुमारे 6 गाड्यांची वाहतूक सुमारे अर्धा तास विस्कळीत झाली होती.

बिहार संपर्क क्रांती एक्स्प्रेसच्या इंजिनपासून चौथ्या बोगीतील प्रवाशांना आग लागल्याचे जाणवले, त्यानंतर गाडी घाईघाईने थांबवण्यात आली. ट्रेन थांबताच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. प्रवासी तात्काळ ट्रेनमधून बाहेर पडले. मात्र, या काळात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही.

समस्तीपूर रेल्वे विभागाचे डीआरएम आलोक अग्रवाल यांनी सांगितले की, थलवारा स्टेशनजवळील बिहार संपर्क क्रांती सुपरफास्टच्या बोगी क्रमांक S2 मध्ये ब्रेक वाइंडिंगमुळे धूर निघाला. धूर लगेच आटोक्यात आला.

या संपूर्ण प्रकारामुळे सुमारे 15 मिनिटे ट्रेन थांबली. परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर ट्रेन रवाना करण्यात आली. प्रवाशांमध्ये कोणतीही भीती नव्हती. ते पुढे म्हणाले की, अनेक वेळा ब्रेक शू फ्लायव्हीलच्या मध्यभागी चिकटल्यामुळे असे घडते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT