six people spotted riding one scooter in mumbai viral video Dainik Gomantak
देश

एकाच स्कूटरवर बसले 6 मित्र ,व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणताल वाह गुरू

सहावा मुलगा बसला पाचव्या मित्राच्या खांद्यावर

दैनिक गोमन्तक

मुंबईतून एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एकाच स्कूटरवर स्कूटरवर 18-20 वर्षे वयोगटातील सहा मुले फिरत आहेत. स्कूटरच्या सीटवर पाच मुलं बसली आहेत आणि सहावा मुलगा मित्राच्या खांद्यावर बसला आहे.व्हायरल झालेला व्हिडिओ अंधेरी पश्चिम येथील स्टार बाजारजवळील लिंक रोडचा आहे. हा व्हिडीओ रस्त्यावरील दुसऱ्या एका कारस्वाराने बनवला आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे.(six people spotted riding one scooter in mumbai viral video)

रमणदीप सिंह होरा नावाच्या युजरने रविवारी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. मुंबई पोलीस आयुक्त आणि मुंबई वाहतूक पोलीस यांना टॅग करत त्यांनी लिहिले – फुक्रपंती मर्यादेपर्यंत पोहोचली आहे. 6 लोक एका स्कूटरवर बसलेआहेत. या व्हिडीओवर कमेंट करताना अनेकांनी या मुलांवर कारवाई करण्याची भाषा केली आहे. अनेक युजर्सनी लिहिले आहे की, हे लोक केवळ अपघाताचे बळी ठरतील असे नाही तर त्यांच्यामुळे इतर कोणीही जखमी होऊ शकतात.

हा व्हिडिओ मुंबई वाहतूक पोलिसांच्याही डोळ्यासमोर आला आहे. या स्कूटरवर स्वार असलेल्या या मुलांची माहिती गोळा करत असल्याचे मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्विटरवर सांगितले आहे. त्यांनी याबाबत परिसरातील पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली असून, त्यांनीही तपास सुरू केला आहे. या मुलांचा पत्ता लागताच वाहतूक पोलिस त्यांच्यावर कारवाई करू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: छत्रीमुळे गेला जीव! स्कुटरवरून पडून महिलेचा दुर्दैवी अंत

Goa Crime: सुट्टी असतानाही गणवेशात घरातून निघाल्या; दोन शाळकरी मैत्रिणी बेपत्ता, कुंकळ्ळी पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Goa Live News Updates: एफडीएच्या अचानक तपासणी मोहिमेत अनेक दुकाने बंद

SCROLL FOR NEXT