Arrest Dainik Gomantak
देश

Pakistan मध्ये 9 महिन्यांत सहा भारतीय कैद्यांचा मृत्यू, परराष्ट्र मंत्रालयाचा आरोप

Indian Prisoners In Pakistan: पाकिस्तानच्या ताब्यातील 6 भारतीयांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमन्तक

India-Pakistan Relations: गेल्या नऊ महिन्यांत सहा भारतीय कैद्यांचा पाकिस्तानच्या कोठडीत मृत्यू झाला, असे शुक्रवारी परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, 'पाकिस्तानच्या ताब्यातील 6 भारतीयांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी 5 मच्छिमार होते. या सहाही जणांनी शिक्षा पूर्ण केली होती. भारतात परतण्याचे आवाहन करुनही त्यांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेण्यात आले होते.'

बागची पुढे म्हणाले की, “पाकिस्तानमधील (Pakistan) तुरुंगात भारतीय कैद्यांच्या मृत्यूची वाढती घटना ही चिंतेची बाब आहे. इस्लामाबादमधील (Islamabad) आमच्या उच्चायुक्ताने भारतीय कैद्यांच्या सुरक्षेचा मुद्दा वारंवार उपस्थित केला आहे. पाकिस्तान सरकारने सर्व भारतीय कैद्यांची तात्काळ सुटका करुन त्यांना भारतात पाठवावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.''

6 भारतीय मच्छिमारांची सुटका केल्याचा पाकिस्तानचा दावा आहे

परराष्ट्र मंत्रालयाचे हे वक्तव्य अशा दिवशी आले आहे, जेव्हा पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ सहा भारतीय मच्छिमारांना बुडण्यापासून वाचवले असल्याचा दावा केला होता. पाकिस्तान सागरी सुरक्षा एजन्सीच्या (PMSA) जहाजाने पूर्व समुद्रकिनारी गस्त घालत असताना सहा भारतीय मच्छिमारांना पाण्यात पाहिले होते. ही घटना गुरुवारी घडली.

दुसरीकडे, एजन्सीने एका निवेदनात म्हटले की, "तात्काळ बचाव कार्य सुरु करण्यात आले असून भारतीय मासेमारी बोटीच्या सर्व क्रू मेंबर्सची सुटका करण्यात आली."

नंतर, अपघातामुळे त्यांची बोट बुडाली आणि त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. सुटका करण्यात आलेल्या मच्छिमारांना नंतर भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाकडे सुपूर्द करण्यात आले, असे निवेदनात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT