Odisha Train Accident Dainik Gomantak
देश

Odisha Train Accident: सिग्नल इंजीनिअर कुटुंबसह खरंच बेपत्ता झाला आहे का? रेल्वे अधिकारी म्हणतात...

Odisha Train Accident: ओडिशातील बालासोर येथे नुकताच रेल्वे अपघात झाला होता. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये जवळपास 300 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

Ashutosh Masgaunde

Odisha Train Accident Signal JE

ओडिशातील बालासोर रेल्वे अपघाताच्या संबंधीत बालासोर स्थानकातील सिग्नल ज्युनिअर सिग्नल जेई फरार झाल्याची माहिती समोर आली होती, त्याबाबत दक्षिण पूर्व रेल्वेचे सीपीआरओ आदित्य कुमार चौधरी यांनी सांगितले की, रेल्वेचा कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी बेपत्ता किंवा फरार नाही. यासोबतच आपले कर्मचारी तपासात सहकार्य करतील असेही रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले आहे.

अधिकृत सूत्रांनुसार, आणखी पाच रेल्वे कर्मचाऱ्यांची सध्या सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. 2 जून रोजी झालेल्या या अपघातात आतापर्यंत 290 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो लोकांवर उपचार सुरू आहेत.

इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये छेडछाड?

वतीने रेल्वे अपघाताचा तपास ६ जून रोजी सुरू झाला. यापूर्वी या प्रकरणी सीबीआयमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये छेडछाड झाल्याची शक्यता व्यक्त होत असताना सरकारने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. अपघातानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये काही छेडछाड झाली असावी.

कोरोमंडल एक्सप्रेस मालगाडीला धडक

बालासोरमध्ये हायस्पीड कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरून लूप लाइनवर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकल्याने हा अपघात झाला. त्याचवेळी त्याचे काही डबे शेजारच्या रुळावरून जाणाऱ्या दुसऱ्या पॅसेंजर ट्रेनलाही धडकले. हा अपघात इतका भीषण होता की, डब्यांचे तुकडे उडून गेले.

292 प्रवाशांचा मृत्यू

या अपघातात आतापर्यंत २९२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात सुमारे 1200 जण जखमी झाले. यामध्ये 100 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर रेल्वेमंत्र्यांशिवाय पंतप्रधान मोदी स्वतःही बालासोरला जाऊन घटनास्थळी गेले होते. रेल्वेमंत्री तीन दिवस घटनास्थळी उपस्थित राहिले आणि 51 तासांत रेल्वे मार्ग पूर्ववत सुरू झाला.

फरार ज्युनिअर सिग्नल इंजीनिअरबद्दल

भारतीय रेल्वेसाठी काम करणारा कनिष्ठ अभियंता (जेई) अमीर खान सोरो येथील अन्नपूर्णा राईस मिलजवळ राहतो. तो अलीकडेच ओडिशातील तिहेरी ट्रेन दुर्घटनेतील संशयित म्हणून चौकशीच्या कक्षेत आला आहे, सध्या केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) कडून चौकशी सुरू आहे.

2 जून रोजी बहनगा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या तिहेरी ट्रेनच्या दुर्घटनेनंतर अमीर खान त्याच्या कुटुंबीयांसह बेपत्ता असल्याची माहिती आहे. सीबीआयने 19 जून रोजी अन्नपूर्णा राईस मिलच्या अगदी जवळ असलेले खान यांचे भाड्याचे घर सील करून कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना देणार नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

SCROLL FOR NEXT