Karnataka CM
Karnataka CM PTI
देश

Karnataka CM: ठरलं ! सिद्धरामय्याच होणार कर्नाटकचे मुख्यमंत्री, डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री, शनिवारी शपथविधी

Pramod Yadav

New Karnataka Chief Minister: कर्नाटक मुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला असून, सिद्धरामय्या कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री असणार आहेत.

काँग्रेसने डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकातील मुख्यमंत्र्यांबाबत सलग चार दिवस मंथन झाल्यानंतर काँग्रेस हायकमांडने निर्णय घेतला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दीर्घ चर्चेनंतर कर्नाटकमध्ये सरकार स्थापनेसाठी एकमत झाले आहे. शनिवारी (20 मे) बेंगळुरू येथे शपथविधी सोहळा होणार आहे.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाची (CLP) बैठक आज (18 मे) सायंकाळी 7 वाजता बेंगळुरूमध्ये बोलावण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) च्या केंद्रीय निरीक्षकांना CLP बैठकीसाठी बेंगळुरूला येण्यास सांगण्यात आले आहे.

मुख्यमंत्रिपदाबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या.

एकमत करण्यासाठी डीके शिवकुमार यांनाही बैठकीला बोलवण्यात आले. आदल्या दिवशी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांच्यात मुख्यमंत्रीपदाबाबत सामायिक करार झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.

बंगळुरूमध्ये शपथविधीची तयारी जोरात सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र सायंकाळपर्यंत पक्षाने या बातम्यांचे खंडन केले आहे.

सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची आज सायंकाळी सात वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. यानंतर काँग्रेस नेते राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करतील.

तत्पूर्वी, मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे सिद्धरामय्या आणि शिवकुमार या दोन्ही नेत्यांनी बुधवारी (17 मे) दिल्लीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची स्वतंत्रपणे भेट घेतली.

त्यानंतर बुधवारी रात्री शिवकुमार यांनी सुरजेवाला यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यानंतर काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल आणि सुरजेवाला यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी त्यांच्याशी चर्चा केली.

सिद्धरामय्या यांनी रात्री वेणुगोपाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी आणि सुरजेवाला यांच्याशी चर्चा केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi ON UCC: ‘’गोव्यातील लोक एक सारखे कपडे घालतात का?’’ समान नागरी कायद्याच्या प्रश्नावर मोदी स्पष्टच बोलले

SSC Result 2024 : पेडणे तालुक्यातील ३२ पैकी १५ शाळांचा निकाल १०० टक्के

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

Goa And Kokan Today's Live News: जेनिफर ऑलिवेरा यांचे सरपंचपद अबाधित

E-Vehicle : ई-वाहन खरेदीकडे ग्राहकांची पाठ; दरमहा ८२४ वाहनांची नोंद

SCROLL FOR NEXT