Shreyas Iyer Admitted ICU Dainik Gomantak
देश

Shreyas Iyer: दुखापतीमुळे चिंता वाढली: श्रेयस अय्यरला ICU मध्ये हलवलं; कुटुंबाला सिडनीला नेण्याची तयारी सुरू

Shreyas Iyer Admitted ICU: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघासाठी एक मोठा धक्का बसला आहे.

Sameer Amunekar

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघासाठी एक मोठा धक्का बसला आहे. क्षेत्ररक्षण करताना श्रेयस अय्यरला झालेल्या दुखापतीमुळे त्याला तत्काळ मैदानाबाहेर नेण्यात आले. सुरुवातीला किरकोळ दुखापत वाटणाऱ्या या घटनेचे गांभीर्य आता वाढले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अय्यरला बरगडीला गंभीर दुखापत झाली असून सध्या तो ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेत आहे.

२५ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या या सामन्यादरम्यान अॅलेक्स कॅरीचा झेल घेण्याच्या प्रयत्नात अय्यर जोरात आदळला. त्यानंतर तो तातडीने जमिनीवर कोसळला आणि वैद्यकीय पथकाने त्याला मैदानाबाहेर नेले.

पुढील तपासणीत बरगडीच्या दुखापतीमुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचे निदर्शनास आले. रक्ताचा संसर्ग वाढू नये म्हणून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि पुढील ५ ते ७ दिवस त्याला आयसीयूमध्ये ठेवले जाण्याची शक्यता आहे.

पालकांना ऑस्ट्रेलियात बोलावले

श्रेयस अय्यरची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याच्या पालकांना ऑस्ट्रेलियात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यासाठी आवश्यक व्हिसा आणि प्रवासाच्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देत आहे.

अय्यरची मालिकेतील कामगिरी

श्रेयस अय्यरने या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत एकूण ७२ धावा करत आपली चांगली फॉर्म दाखवली होती. तिसऱ्या सामन्यात तो फलंदाजीसाठी उतरला नाही, परंतु तो टीम इंडियाच्या मधल्या फळीतला महत्त्वाचा दुवा मानला जातो. अनेकदा त्याने कठीण प्रसंगात संघाला सावरले आहे.

आता, ३० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत अय्यर खेळेल की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, पूर्ण बरे होण्यासाठी त्याला काही आठवडे लागू शकतात. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनालाही पर्यायी पर्याय शोधण्याचा विचार करावा लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli Viral Post: विराट कोहलीचा दोन वर्षांनंतर मोठा निर्णय; सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टनं खळबळ!

Mandovi Bridge: मांडवी पुलावर 'नो एन्ट्री'! 11 जानेवारीला 'या' वेळेत नव्या आणि जुन्या पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद

Raia Fire News: ..आणि बघता बघता डोंगरच पेटला! राय येथील घटना; अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न

Tara Sutaria Breakup: तारा सुतारिया आणि वीर पहाडियाचे ब्रेकअप? 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर नात्यात दुरावा Watch Video

Goa Nature Conference 2026: निसर्गाशी नाते करा घट्ट! गोव्यात रंगणार पहिले निसर्ग संमेलन; तारीख, वेळ जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT