Shreya Ghoshal Dainik Gomantak
देश

Womens World Cup 2025: क्रिकेट विश्वचषक रंगला देशभक्तीच्या सुरांनी, श्रेया घोषालनं गायलं भारताचं राष्ट्रगीत, पाहा VIDEO

Shreya Ghoshal Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालचा आहे.

Manish Jadhav

Shreya Ghoshal Viral Video: आशिया कप 2025 मध्ये फायनल सामन्यात पाकिस्तानची दाणादाण उडवून टीम इंडियाने विजेतेपद पटकावले. संपूर्ण स्पर्धेत भारताने आपल्या दमदार कामगिरीने छाप सोडली. आता 30 ऑक्टोबर म्हणजेच आजपासून महिला वर्ल्डकपचा थरार पाहायला मिळणार आहे.

पहिला सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात होत आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया श्रीलंकेशी दोन हात करणार आहे. याचदरम्यान, सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालचा आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

श्रेया घोषालने गायलं 'जन गण मन'

भारत-श्रीलंका यांच्यातील सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) हिने भारताचे राष्ट्रगीत (National Anthem) गायले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. हाय-होल्टेज सामन्याला एक खास आणि भावनिक किनार मिळाली. श्रेयाच्या आवाजातील गोडवा आणि देशभक्तीची भावना क्रिकेटच्या या महासंग्रामाला अधिक उत्साहपूर्ण आणि अविस्मरणीय बनवले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठ्या लढतींपैकी एक असलेल्या भारत-श्रीलंका सामन्यापूर्वी तिच्या आवाजात राष्ट्रगीत ऐकणे, चाहत्यांसाठी एक अद्भूत क्षण होता.

भारताचा (India) पहिला सामना 30 सप्टेंबर रोजी गुवाहाटीमध्ये श्रीलंकेविरुद्ध होत आहे. त्यानंतर 5 ऑक्टोबर रोजी कोलंबोमध्ये भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना या स्पर्धेतील सर्वात जास्त चर्चेत असलेल्या सामन्यांपैकी एक ठरणार आहे. त्यानंतर भारत 9 ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेशी, तसेच न्यूझीलंड, बांगलादेश आणि 12 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाशी सामना खेळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tilak Varma: "पाकिस्तान आमच्यासमोर टिकू शकत नाही..." आशिया कप फायनलचा हिरो तिलक वर्माची पाकिस्तानवर थेट टीका

Viral Post: रिटायरमेंटनंतर गोव्यात आलेला NRI लगेच परतला; म्हणाला,"दारूशिवाय इथे कुठलीच संस्कृती नाही!"

Amit Shah In Goa: गृहमंत्री अमित शहा शनिवारी गोव्यात; 'माझे घर' योजनेचा होणार शुभारंभ

2 October Dry Day: महात्मा गांधी जयंती निमित्ताने गोव्यात 'कॅसिनो' राहणार बंद, 'ड्राय डे'ची घोषणा; सरकारी आदेश जारी

गोव्यात ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ लागू करा; हिंदू राष्ट्र समन्वय समितीकडून स्वाक्षरी मोहीम

SCROLL FOR NEXT