Shradhha Walkar Case Dainik Gomantak
देश

Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका, केली मोठी मागणी

दिल्ली पोलिसांचा तपास आणि यंत्राणावर देखील उपस्थित केले प्रश्न

Pramod Yadav

Shraddha Murder Case Update: सर्व देशाला हदरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात रोज वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत. लिव्ह-इन पार्टनर आफताब अमीन पूनावाला याने श्रद्धा वालकरची हत्या केली. दरम्यान, श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांकडून केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) कडे हस्तांतरित करण्यात यावा. अशी मागणी करणारी एक जनहित याचिका (PIL) दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) दाखल करण्यात आली आहे.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तपासाबाबत सूक्ष्म आणि संवेदनशील तपशील प्रसारमाध्यमांद्वारे जनतेसमोर उघड केले आहेत. असा दावा एका वकिलाने दाखल केलेल्या या जनहित याचिकेत करण्यात आला आहे. "दिल्ली पोलिसांनी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी तपासाचे अनेक तपशील मीडियासमोर ठेवत सार्वजनिक केले आहेत. याची कायद्यानुसार परवानगी नाही." असे या याचिकेत म्हटले आहे.

"हत्येचा आरोप दिल्लीत करण्यात आला, त्यानंतर पीडितेच्या शरीराच्या अवयवांची वेगवेगळ्या ठिकाणी विल्हेवाट लावण्यात आली. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची कमतरता आणि तांत्रिक साधनांचा अभाव यामुळे मेहरौली पोलिस तपासासाठी सुसज्ज नाहीत." असेही या याचिकेत म्हटले आहे.

गुन्ह्याच्या संबधित जप्तीच्या ठिकाणी मीडिया आणि इतर सार्वजनिक लोकांची उपस्थिती, खटल्यात हस्तक्षेप करण्यासारखे आहे. असा युक्तिवाद याचिकेद्वारे करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT