Belgaum Crime News Dainik Gomantak
देश

Belgaum News: धक्कादायक! बेळगावात कुराडेकर कुटुंबीयांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; तिघांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

Karnataka News: कुराडेकर कुटुंबीयांनी टोकाचे पाऊल का उचलेले याबाबत अधिक तपास केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

Pramod Yadav

कर्नाटक: बेळगावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जोशी मळा येथील कुराडेकर  कुटुंबीयांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला, यातील तीन जणांचा मृत्यू झाला असून, एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जोशी मळा – बेळगाव येथील संतोष कुराडेकर, सुवर्णा कुराडेकर, मंगला कुराडेकर,आणि सुनंदा कुराडेकर यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यातील संतोष, सुवर्णा आणि मंगला यांचा झाला मृत्यू  झाला आहे. तर, सुनंदा यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांनी विष प्राशन करुन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला.

मृतांमध्ये आई, मुलगा आणि मुलगी यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिस स्थानकाचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, घटनेचा अधिक तपास केला जात आहे. कुराडेकर कुटुंबीयांनी टोकाचे पाऊल का उचलेले याबाबत अधिक तपास केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drowning Death: 'मी खेळायला जातो...' शब्द अखेरचे ठरले! धारबांदोडा येथेे दहावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू; दुसऱ्या मित्राला वाचवण्यात यश

Goa Politics: 'आघाडी नको, निवडणूक आम्ही स्वबळावर लढू', काँग्रेस कार्यकर्त्यांची भूमिका; विरोधकांच्या आघाडीचा गुंता अजूनही सुटेना

Baina Robbery Case: नायक कुटुंबीयांच्‍या दुकानातील जुना कामगारच निघाला दरोड्याचा सूत्रधार, 8 दिवसांत छडा; 6 जणांना मुंबईतून अटक

Horoscope: मेहनतीचं फळ दिसेल,आर्थिक स्थैर्य वाढेल; पण 'भावनांवर नियंत्रण हवं!'

आणखी एका मुस्लीमबहुल देशात सत्तापालट! लष्कराने घेतला संसदेचा ताबा, राष्ट्रपतींना ठोकल्या बेड्या; 'हा' वाद ठरला कारण VIDEO

SCROLL FOR NEXT