Science Class  Gomantak Digital Team
देश

धक्कादायक! नववीत शिकणाऱ्या मुलीने सरकारी शाळेच्या वॉशरुममध्ये दिला बाळाला जन्म

Karnataka News: कर्नाटकच्या बालहक्क आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Pramod Yadav

कर्नाटक: नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने शाळेच्या वॉशरुममध्ये बाळाला जन्म दिला. शहापूर येथील सरकारी शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला. बुधवारी (२७ ऑगस्ट) सायंकाळी ही घटना घडली.

कर्नाटकच्या बालहक्क आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, घटनेचा सखोल तपास करुन संशयिताविरोधात गुन्हा दाखल करुन, सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, अल्पवयीन विद्यार्थीनीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शालेय प्रशासनाने देखील याबाबत दुर्लक्ष केल्याचा ठपका शाळेवर ठेवण्यात आला आहे.

बाल हक्क आयोगाच्या आयुक्तांनी याप्रकरणी स्वेच्छा दखल घेऊन शाळेविरोधात देखील तक्रार दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, बाळ आणि अल्पवयीन विद्यार्थीनीची तब्येत व्यवस्थित असल्याचे सांगण्यात आले आहे.

याप्रकरणाची माहिती बाहेरुन मिळाल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केली असून, याबाबत सविस्तर अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शाळेच्या मुख्याध्यापकांनी मात्र याबाबत त्यांना काही कल्पना नसल्याचे सांगताना, विद्यार्थीनी गरोदर असल्याची कोणतीही लक्षणे न दिसल्याचे ते म्हणाले. तसेच, विद्यार्थीनी अनेक दिवस गैरहजर होती, असेही त्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वीच मुख्याध्यापकपदाची जबाबदारी स्वीकारली असल्याचेही मुख्याध्यापक म्हणाले. विद्यार्थीनीचे वय १७ वर्षे ८ महिने असून, ०५ ऑगस्टपासून तिने शाळेत यायला सुरुवात केल्याचेही ते म्हणाले. विद्यार्थीनीने बाळाला जन्म दिल्याने शाळेतील शिक्षकांना देखील आर्श्चयाचा धक्का बसल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बागातील 'त्या' प्रकाराबाबत उत्कंठा वाढली! क्राईम ब्रँचकडून गुन्ह्याची नोंद; व्हिडिओतील टोळक्यापर्यंत पोलिस पोहोचले

VIDEO: "नुसते फटके मारुन चालत नाही!" बाबर आझमचा 'स्लो' खेळ अन् 'फास्ट' उत्तर; सोशल मीडियावर फुटले वादाला तोंड

Bihar Food Poisoning: सत्यनारायणाचा प्रसाद ठरला जीवघेणा! मुजफ्फरपूरमध्ये 100 हून अधिक जणांना अन्नातून विषबाधा; एकाच वेळी अख्खं गाव पडलं आजारी

IPL 2026 Points Table : राजस्थानला नमवून SRH चा गुणतालिकेत धमाका! मोठ्या उलटफेरासह टॉप-5 मध्ये एन्ट्री; मुंबई, चेन्नई आणि कोलकाताची अवस्था बिकट

IPL 2026: उष्णतेचा आयपीएल खेळाडूंवर परिणाम; रोहित शर्मा, विराट कोहली यांनाही त्रास; वाढत्या आर्द्रतेचा फटका

SCROLL FOR NEXT