Tamilnadu Sexual Harassment: तामिळनाडूच्या रुक्मणी देवी कॉलेज ऑफ फाइन आर्ट्सच्या सहायक प्राध्यापकाविरुद्ध शुक्रवारी (31 मार्च) लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलाक्षेत्र फाऊंडेशनच्या एका माजी विद्यार्थिनीने या प्राध्यापकाविरोधात चेन्नई शहर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
माजी विद्यार्थिनीने चेन्नईचे पोलिस आयुक्त शंकर जीवाल यांची भेट घेऊन सहायक प्राध्यापक हरी पद्मन यांनी तिला अश्लील संदेश पाठवल्याची तक्रार केली. ही तक्रार आद्यार महिला पोलिस ठाण्यात पाठवली, जिथे प्राध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पद्मन विरुद्ध आयपीसी कलम 354A (लैंगिक छळ) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
100 हून अधिक विद्यार्थिनींनी तक्रारी केल्या
शुक्रवारी (31 मार्च) कलाक्षेत्र फाऊंडेशनच्या सुमारे शंभर विद्यार्थिनींनी तामिळनाडू महिला आयोगाकडे याचिका दाखल केली, ज्यात किमान चार पुरुष शिक्षकांविरुद्ध गैरवर्तन आणि लैंगिक छळाची तक्रार केली आहे.
लैंगिक शोषणाच्या निषेधार्थ विद्यार्थिनींनी गुरुवारी धरणे आंदोलन सुरू केले होते, जे शुक्रवारीही सुरूच होते. संपामुळे सध्या कॉलेज बंद आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षांनी घेतली विद्यार्थिनींची भेट
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा ए. एस. कुमारी यांनी शुक्रवारी कॅम्पसमध्ये पोहोचून विद्यार्थिनी आणि शिक्षकांची भेट घेतली. पाच तासांच्या चौकशीनंतर ते म्हणाले, "अनेक महिलांनी सांगितले की त्यांना 2008 पासून कॅम्पसमध्ये छळाचा सामना करावा लागला.
आमच्याकडे लैंगिक छळाच्या जवळपास 100 तक्रारी आल्या आहेत. आम्ही कायद्यानुसार कारवाई करू." हे महाविद्यालय केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येते. याबाबत केंद्रीय मंत्रालयाकडेही तक्रार केल्याचे विद्यार्थिनींचे म्हणणे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.