Shivraj Singh Chauhan Video Dainik Gomantak
देश

Shivraj Singh Chauhan Video: लघुशंका प्रकरणातील पीडिताचे मुख्यमंत्र्यांनी धुतले पाय; निवडणुकीच्या तोंडावर डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न

Dashmat Rawat: मध्य प्रदेशात आदीवासी व्यक्तीवर लघुशंका केल्याच्या प्रकरणानंतर, मध्य प्रदेश सरकार अडचणीत आले आहे.

Ashutosh Masgaunde

Shivraj Singh Chauhan Washes Feet Of Dashmat Rawat: मध्य प्रदेशातील सीधी येथे एका आदिवासी व्यक्तीवर प्रवेश शुक्ला या तरुणाने लघुशंका करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हे प्रकरण पेटल्यानंतर पोलिसांनी आरोपी प्रवेश शुक्ला याला अटक केली. आता सीएम शिवराज सिंह चौहान यांनी पीडित दशमत रावतला घरी बोलावले आहे.

सीएम शिवराज यांनी भोपाळ येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दशमत रावत यांचे पाय धुतले आणि त्यांची विचारपूस केली.

यापूर्वी बुधवारी सीधी प्रशासनाने प्रवेश शुक्ला यांच्या घरावर बुलडोझर चालवून त्यांचे बांधकाम जमीनदोस्त केले.

सीएम शिवराज सिंह चौहान यांनीही प्रवेश शुक्ला यांच्यावर एनएसए गुन्हा दाखल करण्याचे सूचोताव केले आहेत.

व्हिडिओ समोर आल्यानंतर रात्रीच पोलिसांनी प्रवेश शुक्लाला अटक केली होती. त्यावेळी शिवराज सिंह चौहान यांनी आरोपींवर कडक कारवाई केली जाईल असे सांगितले होते.

मी हा व्हिडीओ तुमच्यासोबत शेअर करत आहे जेणेकरून सर्वांना समजावे की शिवराज सिंह चौहान मध्य प्रदेशात आहेत, माझ्यासाठी जनता देव आहे. कोणावरही अत्याचार सहन केले जाणार नाहीत. राज्यातील प्रत्येक नागरिकाचा आदर हाच माझा आदर आहे.
शिवराज सिंह चौहान.

शिवराज सिंह यांनी दशमतला घरी बोलावून त्याचे पाय धुतले. मुख्यमंत्र्यांनी शाल देऊन दशमतचा सन्मान केला.

शिवराज सिंह यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ ट्विट केला आहे. शिवराज म्हणाले की, मी दशमतजींची माफी मागतो. माझ्यासाठी ते देव आहे.

याशिवाय शिवराज यांनी दशमतशी अनेक विषयांवर चर्चा केली. शिवराज यांनी दशमतला विचारले की, तुम्ही काय करता, घर चालवण्याचे साधन काय आहे, कोणत्या योजनांचा लाभ मिळत आहे? शिवराज यांनी दशमतला यावेळी सुदामा असेही संबोधले. दशमत आता माझा मित्र असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

सिधी जिल्ह्यात एका आदिवासी तरुणावर लघवी केल्याची घटना समोर आली होती. मद्यधुंद व्यक्ती एका आदिवासी व्यक्तीवर लघवी करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. प्रवेश शुक्ला असे आरोपीचे नाव असल्याचे तपासात समोर आले आहे. प्रवेश शुक्ला हे भाजपचे नेते असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT