Crime News  Dainik Gomantak
देश

Madhya Pradesh Crime: 'तुम्हारी बेवफाई...', बायकोने दिलेल्या धोक्याला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात एका मजुराने पत्नीने दिलेल्या धोक्याला कंटाळून आत्महत्या केली.

Manish Jadhav

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात एका मजुराने पत्नीने दिलेल्या धोक्याला कंटाळून आत्महत्या केली. मजुराने आधी दुकानातून दारु आणली, नंतर त्यात विष मिसळून प्यायला, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

मृताच्या जवळ एक सुसाईड नोटही सापडली असून, त्यामध्ये हिंदीत काहीतरी लिहिले आहे. सुसाईड नोट समजू शकली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याचवेळी आपल्या मुलाची हत्या झाल्याचा आरोप मृताच्या वडिलांनी केला आहे.

दरम्यान, सखनौरचा रहिवासी धनपाल कोलारस पोलिस (Police) स्टेशन हद्दीतील मणिपुरा भागात छेन सिंहच्या घरात भाड्याने राहत होता. त्याच्यासोबत त्याची पत्नी रीनाही राहत होती. रीनाचे छेन सिंहची पत्नी सुनीता जाटव हिच्या भावासोबत कथित संबंध होते. एके दिवशी धनपालची पत्नी रीना सुनीताच्या भावासोबत पळून गेली. एवढेच नाही तर काही वेळाने ती परतही आली.

घरमालक भाड्यावरुन वाद घालत असे

रीना परत येताच धनपालने छेन सिंहचे घर सोडले आणि दुसऱ्या ठिकाणी राहू लागला. भाड्याच्या पैशांवरुन छेन सिंहचा धनपालशी अनेकदा वाद होत असे. एकीकडे पत्नीने दिलेला धोका आणि दुसरीकडे भाड्याबाबत छेन सिंहच्या धमकीमुळे धनपाल अस्वस्थ होऊ लागला. पत्नीने दिलेल्या धोक्यामुळे दुःखी झालेल्या धनपालने दारु पिण्यास सुरुवात केली.

बीआरसी कार्यालयाजवळ मृतदेह आढळला

दुसरीकडे, 16 जुलै रोजी रात्री धनपालचा मृतदेह बीआरसी कार्यालयाजवळ आढळून आला होता. स्थानिक लोकांच्या माहितीवरुन पोलिसांनी धनपालचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. धनपालचा मृत्यू दारुचे अतिसेवन आणि दारुमध्ये विष मिसळल्याने झाला असावा, असा पोलिसांचा संशय आहे.

मृताच्या वडिलांनी या लोकांवर आरोप केले

त्याचवेळी, धनपालच्या खिशात एक सुसाईड नोटही सापडली असून ती अस्पष्ट आणि अशुद्ध हिंदीत लिहिली होती. पोलिस सुसाईड नोटचा तपास करत आहेत. मृत धनपालचे वडील मोहन सिंह आणि भाऊ सोनू जाटव यांनी अशोक, मुरारी, छेन सिंह आणि सुनीता आदींनी धनपालला मारहाण करुन ठार केल्याचा आरोप केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 'गोवा, मुंबईत ड्रग्ज वापरले'! रायपूरमधील 2 महिलांची कबुली; इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून टेक्नो पार्ट्यांचे आयोजन

Goa Politics: खरी कुजबुज; हे नगरसेवक आहेत कुठे?

BITS Pilani: गोव्‍यातीलच 'बिट्‌स' कॅम्‍पसमध्‍ये मृत्‍यू का होतात? युवा काँग्रेसची निदर्शने, सखोल चौकशीची आपची मागणी

Colvale Jail: कोलवाळ कारागृहात छापा! 8 मोबाईलसह तंबाखू हस्तगत; तुरुंगातील रामभरोसे कारभार उघड

Advalpal: ‘तुम्‍ही करोडो कमावता, आम्‍हाला का नागवता?’ अडवलपालमधील जमीनमालकाचा खाण कंपनीला संतप्‍त सवाल

SCROLL FOR NEXT