Shashi Tharoor Manifesto Dainik Gomantak
देश

Shashi Tharoor यांच्या जाहीरनाम्यात दाखवला देशाचा चुकीचा नकाशा, नंतर सुधारली चूक

काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरूर, के. एन त्रिपाठी आणि मल्लिकार्जुन खर्गे मैदानात

गोमन्तक डिजिटल टीम

Shashi Tharoor Manifesto: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. पण, थरूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात मोठी चूक झाल्याने वाद निर्माण झाला आहे. थरूर यांच्या जाहीरनाम्यात देशाचा नकाशाच चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आल्याने अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

(Shashi Tharoor Makes Map Blunder In Manifesto For Congress Polls, Corrects After Row)

काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची आज शेवटचा दिवस होता. अध्यक्षपदासाठी ऐनवेळी मल्लिकार्जुन खर्गे नाव समोर आले आणि दिग्विजय सिंह यांनी माघार घेतली. त्यामुळे शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge & Shashi Tharoor) आणि निवडणूकीसाठी आपला अर्ज दाखल केला. याशिवाय झारखंड येथील काँग्रेस नते के. एन त्रिपाठी (K.N Tripathi) यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला.

शशी थरूर यांच्या जाहीरनाम्यामुळे वाद

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शशी थरूर यांचा जाहीरनामा जाहीर करण्यात आला. या जाहीरनाम्यात भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आला आहे. थरूर यांनी दाखवेल्या नकाशातून जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग वगळण्यात आला आहे.

‘थिंक टुमारो, थिंक थरूर’ अशी टॅगलाइन असलेल्या थरूर यांच्या जाहीरनाम्यात, देशातील काँग्रेस प्रतिनिधित्व करणाऱ्या ठिपक्यांचे जाळे असलेला नकाशा तयार केला आहे. नकाशातून जम्मू-काश्मीर आणि लडाखचा काही भाग वगळण्यात आला आहे.

दरम्यान, या चूकीमुळे थरूर यांच्या जाहीरनाम्यावर नेटकरी चांगलेच संतापले आहेत. अनेकांनी या चुकीला लज्जास्पद असे म्हटले आहे. काहींनी त्यांच्यावर विभाजनचा आरोपही केला आहे. सोशल मिडियामधून होणाऱ्या टिकेनंतर शशी थरूर यांच्या कार्यालयामार्फत नंतर हा नकाशा सुधारण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT