Shashank Singh Predicts Play T20 World Cup Dainik Gomantak
देश

World Cup Prediction: 'मी 2026 च्या विश्वचषकात खेळेन...' अनकॅप्ड खेळाडूचा दावा कशाच्या आधारावर? प्रीती झिंटाचा आवडता खेळाडू चर्चेत

Shashank Singh Predicts Play T20 World Cup: २०२६ चा टी२० विश्वचषक भारत आणि श्रीलंकेत संयुक्तपणे खेळवला जाणार आहे.

Sameer Amunekar

२०२६ चा टी२० विश्वचषक भारत आणि श्रीलंकेत संयुक्तपणे खेळवला जाणार आहे. फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत होणाऱ्या या प्रतिष्ठित स्पर्धेत भारतीय संघ पुन्हा एकदा प्रबळ दावेदार मानला जात आहे. अलीकडेच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आशिया कप २०२५ ट्रॉफी जिंकून आत्मविश्वास उंचावला आहे.

दरम्यान, पंजाब किंग्जचा तडाखेबाज फलंदाज आणि फ्रँचायझी मालकीण प्रीती झिंटाचा आवडता खेळाडू शशांक सिंगने एक धाडसी दावा केला आहे. त्याला खात्री आहे की तो २०२६ च्या विश्वचषकात खेळणारच नाही तर भारताला विजयाकडे नेण्यातही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

शशांकने ESPNcricinfo शी बोलताना म्हटले, “मी एक भविष्यवाणी करतो. मी भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषकात खेळेन आणि टीमला सामने जिंकण्यास मदत करेन. मला माहित नाही ते कसे होईल, पण मला खात्री आहे की ते घडेल.”

त्याने पुढे सूर्यकुमार यादव आणि प्रवीण तांबे यांची उदाहरणे देत सांगितले, “सूर्यकुमार यादवने जेव्हा पहिल्यांदा जोफ्रा आर्चरला षटकार मारला, तेव्हा कुणालाही कल्पना नव्हती की एक दिवस तो भारताचा कर्णधार बनेल. तसेच प्रवीण तांबे ज्याने भारताकडून खेळले नाही, पण ४१ व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केले. क्रिकेटमध्ये काहीही शक्य आहे.”

सध्या टीम इंडियामध्ये जबरदस्त स्पर्धा असल्याने शशांकसाठी स्थान मिळवणे सोपे नाही. तथापि, त्याचा आयपीएल रेकॉर्ड उल्लेखनीय आहे. आतापर्यंत त्याने ४१ सामने, ३३ डावांमध्ये ७७३ धावा केल्या आहेत, त्यात ५ अर्धशतके आणि ४०.६८ चा सरासरी स्ट्राईक रेट आहे. पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना त्याने दमदार फलंदाजी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटविश्वात खळबळ! पाकिस्तानच्या स्टार खेळाडूला अटक, फार्म हाऊसमध्ये मोलकरणीवर केला अत्याचार

Margao: मडगाव पालिकेच्या 'तिठ्या'वरच जुगाराचा अड्डा; सायंकाळ झाली की 'गडगडा' सुरू! प्रशासनाची डोळेझाक

Republic Day 2026 Wishes: भारतात जन्मलो, हेच माझे भाग्य महान! प्रजासत्ताक दिनी शेअर करा 'हे' शुभेच्छा संदेश

Bangladesh Violence: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; गॅरेजमध्ये झोपलेल्या 23 वर्षीय तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं VIDEO

Tamborim Verca: तांबोरी-फात्राडे किनाऱ्यावर तणाव! स्‍थानिकांनी राेखली रेतीची वाहतूक; Watch Video

SCROLL FOR NEXT