sharad pawar 1.jpg 
देश

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत पुन्हा भेट; राजकिय चर्चांना उधान

गोमंन्तक वृत्तसेवा

मागील काही दिवसांपासून देशासह राज्यात राजकीय भेटीगाठींमुळे वातावरण चांगलेच ढवळून निघताना पाहायला मिळत आहे. या भेटींमुळे देशात (india) सध्या राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. त्यातच आज दिल्लीत (Delhi) झालेली एक भेटही महत्वाची ठरत आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर (prashant kishor) यांची भेट. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यातील महिना भरातील दुसरी भेट झाली आहे. त्यामुळे आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीत नेमकं काय दडलंय याची उत्सुकताही अनेकांना लागली आहे. (Sharad Pawar and Prashant Kishor meet again in Delhi Political churches abound)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार काल दिल्लीला (Delhi) रवाना झाले आहेत. ३ दिवसांच्या त्यांच्या या दौऱ्यात ते कोणत्या नेत्यांना भेटणार याची चर्चा सध्या सुरु आहे. अशातच ही भेट म्हणजे देशात तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेला सुरुवात झाली आहे का? असा प्रश्न आता अनेकांना पडतोय कारण मागील काही दिवसांपूर्वीच म्हणजेच 11 जूनला शरद पवार यांच्या मुंबईच्या (Mumbai) सिल्व्हर ओक या निवासस्थानी प्रशांत किशोर यांनी पवारांची भेट घेतली होती. या त्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तृळात चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, आजच्या प्रशांत किशोर आणि शरद पवारांच्या भेटीचा नेमका अर्थ काय आहे हे समजणे महत्वाचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2027: 18 कोटींच्या मेगा ट्रेडनंतर मोठा सस्पेन्स; पंजाब किंग्सचा नवा 'कॅप्टन' कोण, श्रेयस अय्यर की हार्दिक पांड्या?

Goa T20 Squad: अभिनव तेजराणाकडे टी-20 संघाचे नेतृत्व, अर्जुन तेंडुलकर अजूनही अनफिट; स्नेहल कवठणकरला विश्रांती

Stray Dogs: पेडणे न्यायालय परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव; ज्येष्ठ नागरिकाचा घेतला चावा, न्यायालयात येणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

चिमुरडीला कोणीतरी खेचत घेऊन चालला, तेव्हा आपलीच मंडळी त्याला हटकत नव्हती..! म्हापशातील दुर्घटनेने उघडे पाडले समाजाचे सुन्न वास्तव

गोव्यातही सरपंचांची थेट निवड व्हावी!

SCROLL FOR NEXT