Talibani Punishment To Jharkhand Woman By Panchayat Dainik Gomantak
देश

Jharkhand Crime: ‘तालिबानी’ क्रूरता! महिलेला बुटांनी मारले, थुंकी चाटायला लावली... वाचा संपूर्ण प्रकरण!

Jharkhand Crime: झारखंडमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका महिलेचा अपमान करण्यात आला.

Manish Jadhav

Talibani Punishment To Jharkhand Woman By Panchayat: झारखंडमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका महिलेचा अपमान करण्यात आला. तिला जोडे मारण्यात आले.

तिला कान पकडून सिट-अप काढायला लावले. थुंकी चाटण्यास भाग पाडले. एवढेच नाही तर तिला दंडही ठोठावण्यात आला.

हे प्रकरण गढवा शहरातील तिसरतेतुका गावातील आहे. इथे अल्पसंख्याक समाजातील एका विवाहित महिलेचा पंचायतीसमोर अपमान करण्यात आला, कारण तिच्यावर अनैतिक संबंधांचे आरोप करण्यात आले होते.

दुसरीकडे, महिलेने स्वत:वरील आरोप फेटाळत मेरल पोलिसात तक्रार दाखल केली, मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला.

चारित्र्यहीन आणि डायन असल्याचा आरोप

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीडितेने ऑनलाइन तक्रार दाखल केली, ज्यावर आता जिल्हा एसपींनी त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यांनी या घटनेचे वर्णन 'लज्जास्पद' असे केले.

आदेशानुसार कारवाई करत पोलिसांनी (Police) 8 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

30 वर्षीय पीडित महिला मुस्लिम समाजातील आहे. या समाजाची पंचायतही झाली, ज्यात तिच्यावर चारित्र्यहीन आणि डायन असल्याचा आरोप करण्यात आला. ही घटना 15 ऑगस्टची आहे.

गावातील जब्बार अन्सारी, मुजाहिद अन्सारी, इलियास अन्सारी, साकीर अन्सारी, मोकीर अन्सारी, असगर अली, इमामुद्दीन अन्सारी आणि इर्शाद अन्सारी हे त्याच्या घरी आले होते.

एसपींच्या आदेशानुसार आरोपींवर कारवाई

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीडितेने सांगितले की, ते सर्वजण तिला आणि तिच्या पतीला जबरदस्तीने पंचायतीत घेऊन गेले. याच गावातील तरुणासोबत तिचे अवैध संबंध असल्याचा आरोप पंचायतीत करण्यात आला.

महिलेने आणि तिच्या पतीने हे आरोप फेटाळून लावले, पण पंचायतीने मान्य केले नाही आणि सामाजिक बहिष्काराची धमकी देऊन त्यांना शिक्षा स्वीकारण्यास भाग पाडले.

शिक्षा म्हणून महिलेला (Women) 20 जोडे मारण्यात आले. 100 वेळा कान धरुन तिला सिट-अप काढायला लावले. थुंकी चाटण्यास भाग पाडले.

एवढ्यावरच न थांबता तिला 56 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. दुसरीकडे, मेरल पोलिसांनी कारवाई केली नाही, परंतु एसपींनी तात्काळ दखल घेत गढवा एसडीपीओला या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT