Irfan Pathan and Shahid Afridi Fight Dainik Gomantak
देश

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'कुत्र्याचे मांस खाल्ले म्हणून भुंकतोय' इरफान पठाणच्या टीकेवर शाहिद आफ्रिदी भडकला; म्हणाला, "मी त्याला मर्द..."

Irfan Pathan and Shahid Afridi Controversy: २०२५ च्या आशिया कपपूर्वी भारत-पाक क्रिकेट विश्वात एक जुना वाद पुन्हा समोर आला आहे.

Sameer Amunekar

२०२५ च्या आशिया कपपूर्वी भारत-पाक क्रिकेट विश्वात एक जुना वाद पुन्हा समोर आला आहे. माजी भारतीय वेगवान गोलंदाज इरफान पठाणने पाकिस्तानचा माजी अष्टपैलू शाहिद आफ्रिदीबाबत केलेल्या विधानानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक रंगली आहे. या वादामुळे आशिया कपदरम्यान भारत-पाकिस्तान सामन्याभोवतीचा तणाव अधिकच वाढला आहे.

इरफान पठाणची आठवण

इरफान पठाणने एका मुलाखतीत २००६ च्या पाकिस्तान दौऱ्याचा किस्सा सांगितला. भारतीय संघ कराचीहून लाहोरकडे जाणाऱ्या फ्लाइटमध्ये प्रवास करत होता. त्यावेळी शाहिद आफ्रिदीने मस्करीत पठाणचे केस विस्कटले आणि त्याला “बाळ” म्हणत चिडवले. हे ऐकताच पठाण संतापला आणि आफ्रिदीला विचारलं – “तू कधीपासून माझा बाप झालास?” या गोष्टीवरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि फ्लाइटमधील वातावरण तंग झालं.

याचवेळी इरफान पठाणने आणखी एक प्रसंग उलगडला. फ्लाइटमध्ये त्याच्या शेजारी पाकिस्तानचा माजी खेळाडू अब्दुल रझाक बसला होता. मांसाबाबत बोलताना पठाणने चेष्टेत म्हटलं, “इथे कुत्र्याचं मांस मिळतं का? कारण आफ्रिदीने बहुतेक कुत्र्याचं मांस खाल्लं आहे, म्हणूनच तो इतका भुंकतोय.”

आफ्रिदीचा पलटवार

इरफानच्या या आठवणींनंतर शाहिद आफ्रिदीने त्याच्यावर जोरदार टीका केली. त्याने स्पष्टपणे म्हटलं – “मी त्याला मर्द मानतो जो माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलेल. इरफान माझ्या पाठीमागून बोलतोय. माझ्यासमोर आला असता तर मी त्याला योग्य उत्तर दिलं असतं. खोट्या गोष्टींना मी कसा प्रतिसाद देऊ?”

त्याने इरफानच्या देशभक्तीवरही प्रश्न उपस्थित करत म्हटलं, “तो महान भारतीय असल्याचं आणि पाकिस्तानविरोधी असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. पण हा प्रयत्न त्याला आयुष्यभर करत राहावा लागेल.”

भारत-पाक क्रिकेट तणावात भर

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने हे नेहमीच प्रेक्षकांच्या भावना पेटवणारे असतात. आशिया कप २०२५ दरम्यान आधीच वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इरफान पठाण आणि शाहिद आफ्रिदीमधील ही जुनी शाब्दिक भिडंत पुन्हा चर्चेत आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT