Indu Malhotra Dainik Gomantak
देश

PM Modi Security Lapse: इंदू मल्होत्रा ​​यांना धमकी

'सिख्स फॉर जस्टिस' (SFJ) ने म्हटले आहे की इंदू मल्होत्रा ​​यांना पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा प्रकरणाचा तपास करू दिला जाणार नाही.

दैनिक गोमन्तक

काही दिवसांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाबच्या दौऱ्यावर असतांना एक अनपेक्षित घटना घडली. पंतप्रधान मोदी भटिंडाहून हुसैनीवाला येथे जात असतांना त्यांचा ताफा आंदोलकांनी अडवला आणि त्यांच्या सुरक्षेत कुचराई झाली. आंदोलकांमुळे त्यांचा ताफा तब्बल 15 ते 20 मिनिटे उड्डाणपुलावर थांबला होता. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) सुरक्षेच्या कारणावरुण पंजाब (Punjab) दौरा अर्ध्यावर सोडावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणावरुण राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind)यांची भेट सुध्दा घेतली होती तसेच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली.

इंदू मल्होत्रा ​​यांना खलिस्तानी फुटीरतावाद्यांनी धमकी दिली आहे. सुरक्षा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नेमलेल्या समितीच्या अध्यक्षा इंदू मल्होत्रा (Indu Malhotra) यांना पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा प्रकरणाचा तपास करू दिला जाणार नाही असे 'सिख्स फॉर जस्टिस' (SFJ) ने म्हटले आहे.

दरम्यान यासंदर्भात माजी न्यायमूर्ती मल्होत्रा ​​यांच्यासह अनेक वकिलांना व्हॉईस नोट पाठवण्यात आली आहे. या व्हॉईस नोटमध्ये म्हटले आहे की, 'आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीची चौकशी करू देणार नाही. तसेच आम्ही सुप्रीम कोर्टाच्या वकिलांचीही यादी तयार करत आहोत.' यापूर्वी सुध्दा या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या अनेक वकिलांना धमकीचे फोन आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: लखनौ-आग्रा एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली डबल डेकर बस उलटली; 6 जणांचा मृत्यू, 19 जखमी

IPL Qualifier 1 Bengaluru vs Gujarat: गुजरातचं टेन्शन वाढलं! क्वालिफायर-1 पूर्वी RCB च्या संघात 'या' मॅचविनर खेळाडूची एन्ट्री; बंगळुरूला मोठा दिलासा

Horoscope: मंगळवारचा दिवस 'या' राशींसाठी ठरणार वरदान; बजरंगबलीच्या आशीर्वादाने उघडणार नशिबाचे टाळे! सर्व कामं होणार यशस्वी

Goa Politics: 'आरजी'मधील घडामोडी गोव्यातील परंपरेला धरूनच

पंधरा वर्षांनंतर राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण!

SCROLL FOR NEXT