Rat Hole Mine In Assam Dainik Gomantak
देश

Rat Hole Mine In Assam: आसाममधील ‘रॅट होल’ खाणीत शिरले पाणी, अनेक मजूर अडकले; युद्धपातळीवर बचावकार्य सुरु

Assam Mines Accident: आसामामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील रॅट होल खाणीत पाणी शिरल्याने सुमारे 18 मजूर अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय.

Manish Jadhav

Assam Mines Accident: आसामामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील रॅट होल खाणीत पाणी शिरल्याने सुमारे 18 मजूर अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय. 300 फूट खोल असणारी ही कोळशाची खाण दिमा हासाओ जिल्ह्यातील दुर्गम भाग असणाऱ्या उमरंगसो येथे आहे. बेकायदेशीर खाणीत सुमारे 100 फुटांपर्यंत पाणी शिरल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दरम्यान, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून दोन मोटर पंपांच्या सहाय्याने पाणी काढण्याचे काम सुरु आहे. तसेच, राज्य आपत्ती दल (SDRF) आणि राष्ट्रीय आपत्ती दल (NDRF) च्या तुकड्याही मेघालय सीमेच्या जवळ असलेल्या या भागाकडे रवाना झाल्या आहेत.

आम्लयुक्त पाणी

"रॅट होल" हे एक धोकादायक यंत्र आहे, जिथे मजूर हाताने खोदकाम करतात, ज्यामुळे खोल खड्डे पडतात, ज्यातून कोळसा काढला जातो. हे पर्यावरणासाठी खूपच धोकादायक आहे. खाणीतून सोडले जाणारे आम्लयुक्त पाणी शेती आणि मानवी वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या स्त्रोतांसाठी विषारी ठरते.

यापूर्वी अशीच घटना

2018 मध्ये मेघालयातील पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्यातील एका बेकायदेशीर कोळसा खाणीत 15 खाण कामगार अडकल्याची अशीच धक्कादायक घटना समोर आली होती. जवळच असणाऱ्या नदीचे पाणी खाणीत शिरले होते. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सने दोन मृतदेह पाहिले होते, असे तत्कालीन कमांडंट एसके शास्त्री यांनी सांगितले होते.

100 कोटींचा दंड ठोठावला

तसेच, 2019 मध्ये राज्यातील बेकायदेशीर कोळसा खाणकाम रोखण्यात अयशस्वी ठरल्याबद्दल राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (NGT) मेघालय सरकारला 100 कोटींचा दंड ठोठावला होता. राज्यातील 24 हजार खाणींपैकी बहुतांश खाणी बेकायदा असल्याचे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाला आढळून आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ruturaj Gaikwad Century: ऋतुराज गायकवाडचं वादळ! गोव्याविरुद्ध झळकावलं शानदार शतक; बनला 'विजय हजारे ट्रॉफी'चा नवा 'सेंच्युरी किंग'

झारखंड दारु घोटाळा! छत्तीसगडच्या मद्य व्यावसायिक नवीन केडियाला गोव्यातून अटक; ACB ची कारवाई

"26 वर्षे देशाची सेवा केली, आता ओळख विचारताय?" निवडणूक आयोगाच्या नोटिसमुळे खासदार विरियातो संतापले

WPL 2026: गोमंतकीय क्रिकेटरचा ‘डब्ल्यूपीएल’मध्ये कल्ला! दिल्ली कॅपिटल्सला ठोकला रामराम; यूपी वॉरियर्ससोबत नवीन इनिंग

नोकरी सोडली, अयोध्येचे राम मंदिर बनवले; 108 ठिकाणी भ्रमंतीची केली भीष्मप्रतिज्ञा, तुमकूरमधील रामभक्ताची कहाणी

SCROLL FOR NEXT