Assam Rifles च्या जवानाचा 6 सहकाऱ्यांवर गोळीबार, नंतर स्वतःवरही झाडली गोळी

Assam Rifles Jawan: या घटनेत जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर का गोळीबार केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, या घटनेचा मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराशी कोणताही संबंध नाही असेही पोलिसांनी सांगितले.
Assam Rifles Jawan
Assam Rifles Jawan Dainik Gomantak
Published on
Updated on

Assam Rifles jawan shoots 6 soldiers, then shoots himself:

मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे आसाम राफल्सच्या जवानाने आपल्याच सहा सहकाऱ्यांवर गोळीबार केल्यानंतर स्वत:वरही गोळी झाडून घेतली. यामध्ये जवानाचा मृत्यू झाला आहे. तर 6 जवान गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना साजिक मंदिर परिसरात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, 23/24 जानेवारीच्या रात्री, हा गोळीबार करणारा जवान अचानक जागा झाला. आपल्याला कोणीतरी मारेल असे स्वप्न पडल्याचे तो ओरडू लागला. त्याला धीर दिला आणि शांत केले आणि नंतर पुन्हा सगळे झोपी गेले. हा जवान पुन्हा झोपेतून जागा झाला आणि त्याने आपल्या साथीदारांवर गोळीबार केला.

Assam Rifles Jawan
Republic Day च्या परेडची कमान महिलांकडे, 13 हजार पाहुण्यांसमोर दाखवणार भारताची ताकद

या घटनेत जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर का गोळीबार केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, या घटनेचा मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराशी कोणताही संबंध नाही असेही पोलिसांनी सांगितले.

"या घटनेत जखमी झालेल्यापैंकी एकही जवान मिणिपूरचा नाही. त्यामुळे मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार आणि याचा कोणताही संबंध नाही. हा प्रकार का घडला याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे आसाम रायफल्सच्या महानिरिक्षकांनी सांगितले आहे.

Assam Rifles Jawan
"पत्नीचा हेकट स्वभाव ही मानसिक क्रूरता," हायकोर्टाने दिला पतीच्या बाजूने घटस्फोटाचा आदेश

या गोळीबारात जखमी झालेल्यांना चुरचंदपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असली तरी गंभीर आहे.

IGAR द्वारे जारी केलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, सर्व आसाम रायफल्स बटालियनमध्ये मिश्रित वर्ग रचना आहे, ज्यात मणिपूरमधील विविध समुदायांचा समावेश आहे. "मणिपूरमध्ये शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी समाजाचे ध्रुवीकरण असूनही सर्व कर्मचारी एकत्र राहून काम करत आहेत."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com