seven naxalites killed  dainik gomantak
देश

Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई; दांतेवाडामध्ये चकमकीत 7 नक्षलवादी ठार

Chhattisgarh: छत्तीसगडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. सुरक्षा दले अणि नक्षलवादी यांच्यात पुन्हा एकदा चकमक झाली.

Manish Jadhav

Chhattisgarh: छत्तीसगडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. सुरक्षा दले अणि नक्षलवादी यांच्यात पुन्हा एकदा चकमक झाली. नारायणपूर, बिजापूर आणि दांतेवाडा सीमेवरील नक्षलग्रस्त भागात जवानांनी 7 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. घटनास्थळावरुन आतापर्यंत दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. असे सांगितले जात आहे की, गुरुवारी तीन जिल्ह्यांतील 1000 जवान सर्च ऑपरेशन करत होते. यादरम्यान नक्षलवादी आणि जवानांमध्ये वेगवेगळ्या भागात चकमक सुरु झाली. नारायणपूरचे एसपी प्रभात कुमार यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

दरम्यान, छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची कारवाई सुरु आहे. दांतेवाडा येथील पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आतापर्यंत सात नक्षलवादी ठार झाले आहेत. हा आकडा आणखी वाढू शकतो, अशी माहिती समोर येत आहे.

पोलिसांच्या पथकावर गोळीबार करण्यात आला

सर्च ऑपरेशन सुरु असताना जंगलात लपलेल्या नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरु केला. मिळालेल्या माहितीनुसार, 10 ते 12 नक्षलवादी जखमी झाल्याची शक्यता आहे. सध्या संपूर्ण परिसराला सुरक्षा दलांनी वेढा घातला असून कारवाई सुरु आहे.

महिन्याभरात अनेक नक्षलवादी मारले गेले

30 एप्रिल रोजी नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलात सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत तीन महिलांसह दहा नक्षलवादी ठार झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 एप्रिल रोजी कांकेर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 29 नक्षलवाद्यांना ठार केले होते. 10 मे रोजी बिजापूर जिल्ह्यातील पिडिया गावाजवळ सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत 12 नक्षलवादी ठार झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 07 July 2025: आरोग्यावर लक्ष द्या, खर्च वाढू शकतो; महत्त्वाच्या कामात यश मिळेल

IND vs ENG: 58 वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये 'चक दे इंडिया', इंग्रजांना 336 धावांनी चारली पराभवाची धूळ; मालिकेत बरोबरी

Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

Honnali Nawab: मुंबईहून इंग्रजी सैन्य कुर्गच्या वाटेने श्रीरंगपट्टणकडे निघाले, शौर्यगाथा होन्नालीच्या नवाबाची

New Cricket League: क्रिडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी! भारतात सुरू होणार आणखी एक टी-20 लीग, 6 संघांमध्ये रंगणार स्पर्धा

SCROLL FOR NEXT