

Suryakumar Yadav Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या 5 सामन्यांच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका खास यादीत त्याने स्थान मिळवले असून हा पराक्रम करणारा तो जगातील पाचवा खेळाडू ठरला. या विक्रमात त्याने माजी कर्णधार रोहित शर्मालाही मागे सोडले.
सूर्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात दोन दमदार षटकार मारताच, त्याने त्याच्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 150 षटकारांचा टप्पा पूर्ण केला. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 षटकार पूर्ण करणारा तो जगातील पाचवा फलंदाज ठरला. भारताकडून 150 टी20 आंतरराष्ट्रीय षटकार मारणारा तो रोहित शर्मा नंतरचा दुसरा खेळाडू ठरला. रोहित शर्माने एकूण 205 षटकार मारले आहेत.
सूर्यकुमार यादवच्या या विक्रमाची सर्वात खास गोष्ट म्हणजे, त्याने सर्वात कमी डावांमध्ये (Innings) हा टप्पा गाठून रोहित शर्मालाही मागे सोडले. या कामगिरीमुळे सूर्यकुमार यादव टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये भारतासाठी सर्वात जलद 150 षटकार ठोकणारा फलंदाज बनला.
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 150 षटकार ठोकण्याचा जागतिक विक्रम संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) मुहम्मद वसीम (66 डाव) च्या नावावर आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव आहे. पूर्ण सदस्यत्व असलेल्या (Full Member) देशांच्या संघांमध्ये पाहिल्यास सर्वात जलद 150 षटकार ठोकणारा फलंदाज म्हणून सूर्यकुमार यादव अव्वल स्थानी आहे.
हा सामना सूर्यकुमार यादवसाठी अनेक अर्थांनी खास ठरला. मागील 5 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याला 20 धावांचा टप्पाही पार करता आला नव्हता. आशिया कप 2025 दरम्यान त्याने 7 सामन्यांमध्ये एकही अर्धशतक झळकावले नव्हते आणि 20 धावांचा टप्पा फक्त एकदाच पार केला होता. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या पहिल्या टी20 सामन्यात त्याने दमदार फलंदाजी करत 30 हून अधिक धावा करुन आपल्या फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.