Pakistan Inflation Dainik Gomantak
देश

'त्यांची कुत्रेही उपाशी राहू नयेत...पाठवा गहू', आरएसएस नेत्याने भारत सरकारला केले आवाहन

पाकिस्तानमधील महागाई 30 टक्क्यांच्या जवळ पोहोचली आहे.

Pramod Yadav

पाकिस्तान सध्या सगळ्यात वाईट आर्थिक संकटातून जात आहे. देशाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून, तेथील महागाई 30 टक्क्यांच्या जवळ पोहोचली आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले असताना पीठ 250 रुपये किलोने विकले जात आहे. अशात आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला भारत मदत करणार का, असा प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित होत आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सह सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल यांनी भारत सरकारला एक आवाहन केले आहे. "पाकिस्तानने मदत मागितली नाही तरी त्यांना भारताने मदत करावी. त्यांचे कुत्रेही उपाशी मरू नये, याची काळजी सरकारने घ्यायला हवी. पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीवर चिंता व्यक्त करताना कृष्ण गोपाल म्हणाले की, भारताने पाकिस्तानला 10 ते 20 लाख टन गहू पाठवावा. भारत सरकारने शेजारी धर्माचे पालन करावे."

कृष्ण गोपाल यांनी पाकिस्तानमध्ये पीठ 250 रुपये किलो झाल्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. पाकिस्तानची स्थिती पाहून वाईट वाटते आहे, लोक खाद्यपदार्थांसाठी झगडत आहेत. 70 वर्षांपूर्वी आपण असेच होतो, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. त्यांचा कुत्राही उपाशी राहू नये याची काळजी घेतली पाहिजे. असेही गोपाल म्हणाले.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानच्या आर्थिक संकटावर भाष्य केले होते. कोणताही देश दहशतवादाचा मुख्य उद्योग म्हणून उपयोग करत असेल तर देश कठीण परिस्थितीतून बाहेर पडू शकणार नाही. गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेच्या मदतीचा उल्लेख करताना ते म्हणाले, भारत आणि श्रीलंकेचे संबंध पाकिस्तानपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत.

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. देशातील परकीय चलनाचा साठा देखील अल्प प्रमाणात शिल्लक आहे. अशात जगातील प्रमुख संघटना जागतिक बँक आणि आयएमएफ यांनी देखील पाकिस्तानला कर्ज देण्यापासून नकार दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT