Jammu-Kashmir Encounter
Jammu-Kashmir Encounter Dainik Gomantak
देश

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक, सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शोपियांच्या बडगामच्या जैनपुरा भागात 2-3 दहशतवादी लपल्याची माहिती आहे. या माहितीनंतर सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. (Security forces killed two militants in a clash in shopian, Jammu and Kashmir)

या कारवाईचे चकमकीत रूपांतर झाले असून हा अहवाल येईपर्यंत चकमक सुरूच असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, आतापर्यंत येथे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आम्ही या संदर्भात अधिक माहितीची वाट पाहत आहोत.

सध्या दक्षिण काश्मीरमध्ये (Kashmir) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. सुरक्षा दलांसोबतच दहशतवादी खोऱ्यातील सर्वसामान्यांनाही लक्ष्य करत आहेत. बुधवार, 13 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी सतीश कुमार सिंग या स्थानिक ड्रायव्हरची गोळ्या झाडून हत्या (Murder Case) केली. सतीश हा कुलगाममधील कुकरनचा रहिवासी होता. त्यांनी परिसराची नाकेबंदी केल्याचे पोलिसांनी सांगितले.

या भीषण गुन्ह्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा लवकरच खात्मा केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, दहशतवाद्यांचा आम्ही सातत्याने शोध घेत आहोत.

स्थानिक नागरिकांची हत्या

बडगाम जिल्ह्यातील गोटपोरा येथे दहशतवाद्यांनी तजमुल मोहिउद्दीन नावाच्या व्यक्तीला गोळ्या घातल्या. मोहिउद्दीन यांच्यावर त्यांच्या घराजवळ हल्ला करण्यात आला. गोळी लागल्याने त्याला रुग्णालयात नेले जात होते, मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. यापूर्वी रविवारी सुतारकाम करणाऱ्या एका स्थलांतरित मजुरावरही दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या होत्या. पुलवामा जिल्ह्यातही ही घटना घडली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT