तालिबानची क्रूरता सुरुच, अमेरिकेला मदत करणारे 500 अधिकारी गायब

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) गेल्या वर्षी सत्तेत परत आल्यापासून तालिबान अमेरिकन संस्थाना मदत करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांचा शोध घेत आहे.
Taliban
TalibanDainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) गेल्या वर्षी सत्तेत परत आल्यापासून तालिबान अमेरिकन संस्थाना मदत करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांचा शोध घेत आहे. आपल्या आश्वासनाच्या विरुद्ध, तालिबान अनेक महिन्यांपासून अशा अधिकाऱ्यांची चौकशी करत आहेत. त्याच वेळी, तालिबानने (Taliban) सर्व सरकारी अधिकाऱ्यांना माफ करणार असल्याचे म्हटले होते. परंतु आता ते अशा लोकांना अटक करुन शिक्षा देत आहे. डीएनएच्या अहवालानुसार, आतापर्यंत 500 सरकारी अधिकारी मारले गेले आहेत किंवा बेपत्ता झाले आहेत. दुसरीकडे मात्र, तालिबानने आपल्यावर केलेले आरोप फेटाळून लावले असून हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. (The Taliban's brutality continues in Afghanistan)

खरं तर, अमेरिका (America) आणि नाटोला (NATO) मदत करणाऱ्या अफगाण सैनिक आणि सरकारी अधिकाऱ्यांचे तळ शोधण्यासाठी तालिबान विविध क्लृप्त्या वापरत आहे. आतापर्यंत अमेरिकेला मदत करणाऱ्या 500 हून अधिक लोकांना ठार मारण्यात आले आहे किंवा त्यांना ओलीस ठेवण्यात आले आहे. या सर्वांवर तालिबानविरुध्द शत्रू अमेरिकेला मदत केल्याचा आरोप आहे. न्यूज एजन्सी एएनआयने इंग्रजी वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्सच्या तपासणीचा हवाला देत म्हटले आहे की, 'तालिबानने सत्तेत येताच अशा लोकांना शिक्षा देण्यास सुरुवात केली होती.' यापूर्वीही तालिबानवर असे आरोप करण्यात आले आहेत.

Taliban
तालिबान ला मान्यता मिळनार? नॉर्वे येथे चर्चा सुरू

अहवालात काय म्हटले आहे?

अहवालानुसार, अवघ्या सहा महिन्यांत सुमारे 500 लष्कराचे जवान, अधिकारी आणि परराष्ट्र विभागाचे अधिकारी एकतर मारले गेले किंवा अचानक बेपत्ता झाले आहेत. कंधारमधून 114 जण बेपत्ता झाले असून बागलाण शहरात 86 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. सैनिक, अधिकारी आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांना माफ करणार असल्याची घोषणा तालिबानकडून करण्यात आली तेव्हा अशी कारवाई करण्यात आली आहे. अफगाणिस्तानच्या लष्करी कमांडरने रशियाची (Russia) अधिकृत वृत्तसंस्था स्पुतनिकमधून अनेक महत्त्वाच्या गोष्टी उघड केल्या आहेत. त्यांनी म्हटले की, ''तालिबानने लष्करी कर्मचारी, सरकारी कर्मचारी, अधिकारी आणि इतरांना माफी मागण्यासाठी पोलिस मुख्यालयात बोलावले होते.''

Taliban
'अगाणिस्तानच्या आर्थिक संकटाला अमेरिका जबाबदार': तालिबान

तालिबानी सैनिकांनी आधी पोलिस मुख्यालयात पोहोचलेल्या लोकांची विचारपूस केली आणि नंतर त्यांना बेदम मारहाण केली. त्यातल्या काहींना अमानुष मारहाणीत मृत्यू झाला, तर काहींना तालिबानने त्यांच्या पद्धतीने फाशीची शिक्षा दिली. तालिबानने या लोकांना सांगितले होते की, ते आमच्या विरोधात अनेक वर्षे लढले आणि आमच्या साथीदारांना मारले. मग त्यांना जिवंत कसे सोडायचे? तालिबानने सरकारी कर्मचारी आणि लष्करी जवानांची माहिती आधीच गोळा केली होती. यामध्ये फॉरेन्सिक व्हिडिओ तपासणी, स्थानिक मीडिया रिपोर्ट्स आणि पीडित, साक्षीदार आणि पीडितांच्या कुटुंबियांशी थेट संवाद समाविष्ट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com