Russia Ukraine war dainikgomantak
देश

Russia Ukraine war : युक्रेनमध्ये पंजाबच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Russia Ukraine war : भारताला मोठा धक्का, युक्रेनमध्ये पंजाबच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

दैनिक गोमन्तक

Russia Ukraine war : युक्रेन-रशियाच्या युद्धातून एक मोठी बातमी समोर आली असून युक्रेनमध्ये झालेल्या गोळीबारात (Firing) आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू (Indian Student Death in Ukraine) झाला आहे. आज मृत्यू झालेला विद्यार्थी हा पंजाबमधील बर्नाला येथील रहिवासी असल्याचे समजते. त्यामुळे आजची ही बातमी देशात खळबळ माजवणारी ठरत आहे. (Second Indian Student dies in Ukraine)

युक्रेन-रशियाच्या युद्धात खार्किव शहारात धुमचक्री उडाली आहे. त्यामुळे अनेक भारतीय अजून युद्धात युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. त्यांना परत आणण्याचा प्रयत्न भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून (Ministry of Foreign Affairs) सुरू आहे.

युक्रेन-रशियाच्या युद्धामुळे अनेकजण युक्रेन सोडून आजुबाजुच्या देशात जाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र काही ठिकाणी त्यांची अडवणूक होत आहे. युक्रेनमध्ये रशिया (Russia) आणि युक्रेनियन (Ukraine) सैन्याकडून सतत गोळीबाबत, बॉम्बहल्ले, मिसाईल हल्ले होत आहेत. यात आतापर्यंत अनेक युक्रेनियन नागरिक मारले गेले आहेत. यात अनेक युक्रेनच्या सैनिकांचाही मृत्यू झाला आहे. काही दिवसांपुर्वी एकाही भारतीयच्या मृत्यूची बातमी समोर आली नव्हती. मात्र त्यानंतर कर्नाटकमधील (karnataka) हावेरी जिल्ह्यातील नवीन शेखरप्पा या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती. त्याचे देशावरचे दु:ख कमी होतो न होतो तेच आज बुधवारी खार्किव येथून भारतासाठी पुन्हा वाईट बातमी आली आहे. युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा (Student) मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT