Students Dainik Gomantak
देश

Karnataka Hijab Row: राज्यातील महाविद्यालये पुढील बुधवारपर्यंत राहणार बंद

कर्नाटकात हिजाब प्रकरणी तणावाचे वातावरण आहे. या संपूर्ण वादावर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठात सुनावणी सुरु पार पडली. राज्यातील शाळा आणि महाविद्यालये बुधवारपर्यंत बंद राहणार आहेत.

दैनिक गोमन्तक

हिजाबच्या वादामुळे कर्नाटकातील इयत्ता 11वी आणि 12 वीचे वर्ग आणि महाविद्यालये येत्या बुधवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिजाब बंदीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर उच्च न्यायालयाची सुनावणी सोमवारी सुरु राहणार असल्याने वर्ग बंद राहतील, असे कर्नाटक सरकारने जाहीर केले आहे. याआधी, हिजाबचा वाद वाढल्यामुळे, राजधानी बेंगळुरुमधील पोलिसांनी दोन आठवड्यांसाठी शैक्षणिक संस्थांजवळ सर्व प्रकारचे मेळावे आणि निदर्शनांवर बंदी घातली आहे. (Schools and colleges for classes 11-12 in Karnataka will remain closed till next Wednesday)

दरम्यान, हिजाबवरील बंदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत उडुपीमधील सरकारी महाविद्यालयातील पाच मुलींच्या वतीने कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर बुधवारी कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी झाली, ज्यामध्ये उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी मोठ्या खंडपीठात करण्याची शिफारस केली. मंगळवारी उच्च न्यायालयाने संबंधित पक्षांना याप्रकरणी शांतता राखण्याचे आवाहन केले.

न्यायालयाने म्हटले होते की, "या प्रकरणाच्या पुढील सुनावणीपर्यंत, हे न्यायालय विद्यार्थी आणि जनतेला शांतता राखण्याची विनंती करते. या न्यायालयाचा जनतेच्या शहाणपणावर पूर्ण विश्वास आहे.'' विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांमध्ये हिजाबच्या समर्थन आणि विरोधाबाबत निदर्शने होत आहेत. यादरम्यान तुरळक हिंसाचारही पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pisurle: विद्यार्थ्यांनी फुलविली झेंडूची फुले, पिसुर्ले सरकारी विद्यालयात 'ग्रीन वॉरिअर इको' क्लबचा स्तुत्य उपक्रम

Horoscope: आजचा दिवस 'गोल्डन' ठरणार! मिथुन, कर्कसह 'या' 4 भाग्यवान राशींना करिअरमध्ये मोठे यश, वाचा तुमचे भविष्य

Goa Live News: कदंब बसच्या धडकेत 23 वर्षीय तरुणी ठार, एकजण जखमी; वेर्णा येथे झाला अपघात

Tilak Varma: आशिया कपमध्ये कमाल, आता तिलक वर्मा करणार कॅप्टन्सी! टीमची झाली घोषणा; पाहा संपूर्ण संघ

BJP Rath Yatra Goa: भाजपतर्फे 25 डिसेंबरपर्यंत रथयात्रा, पदयात्रा; मतदारसंघनिहाय मेळावे होणार, स्वदेशीचा नारा करणार बुलंद

SCROLL FOR NEXT