Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: 'पप्पा पोलीसमध्ये आहेत, गोळी घालेन...', होमवर्क दिल्यावर चिमुकल्याची थेट शिक्षिकेला धमकी; 'लिटिल डॉन'चा व्हिडिओ व्हायरल!

Viral Schoolboy Video: सध्या सोशल मीडियावर एका व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमचे डोळे विस्फारतील, हसू आवरणार नाही.

Manish Jadhav

Viral Schoolboy Video: सध्या सोशल मीडियावर एका व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमचे डोळे विस्फारतील, हसू आवरणार नाही आणि शेवटी मनात एकच प्रश्न येईल की, हा मुलगा आहे की एखाद्या बॉलिवूड चित्रपटातील खलनायक? शाळेच्या वर्गात शूट झालेला हा व्हिडिओ सध्या इतका व्हायरल झाला की, त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

आधी हा व्हिडिओ पाहा!

चिमुकल्याने शिक्षिकेला दिली धमकी

दरम्यान, व्हिडिओची सुरुवात शाळेच्या (School) एका वर्गातून होते, जिथे एक लहान मुलगा आपल्या शिक्षिकेसमोर बसलेला आहे. त्याच्या डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर निरागसता दिसत आहे. पण या मुलाच्या तोंडी असा डायलॉग आहे की, बॉलिवूडमधील खलनायकही लाजतील. हा मुलगा रडत रडत आपल्या शिक्षिकेला धमकी देताना दिसत आहे. तो आपल्या शिक्षिकेला म्हणतो, "माझे बाबा पोलीसमध्ये आहेत, मी तुम्हाला गोळी मारेन." एवढ्यावरच तो थांबत नाहीतर पुढे म्हणतो की, "घरात संदूकावर बंदूक ठेवली आहे, मी तुम्हाला सांगतोय." शिक्षिका सुरुवातीला आवाक होते, पण नंतर मुलाच्या या धमकीवर मोठ्याने हसू लागते.

लोकांनी मुलाला 'फ्युचर गँगस्टर' म्हटले

हा व्हायरल व्हिडिओ @jpsin1 नावाच्या 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. पाहता पाहता हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि हजारो लाईक्स मिळाले आहेत.

युझर्संनी या मुलाला 'लिटिल डॉन', 'फ्युचर गँगस्टर' आणि 'क्लासरुम का क्राईम पेट्रोल' असे म्हटले. एका युझरने गंमतीने लिहिले की, "हा मुलगा नाही, तर लहानपणापासूनच 'डॉन को पकडना मुश्किल ही नही, नामुमकिन है' वाला फील देत आहे!" दुसऱ्याने लिहिले की, "शिक्षिकेला गोळी मारण्याची धमकी देऊनही पास होण्याचा आत्मविश्वास फक्त याच मुलामध्ये असू शकतो." काही लोक तर मुलाच्या निरागसतेवर फिदा झाले, तर काहीजणांनी मजेत म्हटले की, याला आत्ताच चित्रपटांमध्ये (Moive) साईन करुन घ्यायला पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Mhaje Ghar Yojana: 'माझे घर'ला विरोध करणाऱ्यांना जवळ करू नका!- मुख्यमंत्री

Silent Heart Attack: सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? दुर्लक्ष करणं पडू शकत महागात; जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि धोकादायक परिणाम

EPFO PF Withdrawal: खुशखबर! PF मधून आता 100 टक्के रक्कम काढता येणार

Goa Crime: 'गॅस सिलिंडर'च्या वादातून जीवघेणा हल्ला; 3 आरोपींना पकडण्यासाठी गोवा पोलिसांचे राजस्थानात धाडसत्र

Viral Video: 'आता घरी चल, मग बघतेच...!' चालत्या बाईकवर बायकोची नवऱ्याला बुक्क्यांनी मारहाण; रोमँटिक गाण्यासह व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT