Saurav Das Dainik Gomantak
देश

Saurav Das Lookout Circular: सौरव दासविरुद्ध लूकआउट 'सर्क्युलर जारी'! केंद्र सरकारची दिल्ली हायकोर्टात माहिती; परदेश प्रवास रोखल्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट

Saurav Das Lookout Circular Loc Delhi High Court: सीजेपी नेता सौरव दास याच्याविरोधात लूकआउट सर्क्युलर जारी करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने आज (26 नोव्हेंबर) दिल्ली उच्च न्यायालयात दिली.

Manish Jadhav

Saurav Das Lookout Circular Loc Delhi High Court: सीजेपी नेता सौरव दास याच्याविरोधात लूकआउट सर्क्युलर जारी करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने आज (26 नोव्हेंबर) दिल्ली उच्च न्यायालयात दिली. परदेश प्रवास रोखल्याविरुद्ध दासने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरु असताना केंद्राने ही भूमिका मांडली. गुन्हेगारी आरोप किंवा कायदेशीर प्रकरणांमध्ये अडकलेल्या व्यक्तींना देशाबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी इमिग्रेशन ब्युरोकडून विमानतळांसह सर्व प्रवेश व निर्गमन केंद्रांवर 'लूकआउट सर्क्युलर' तयार केले जाते.

दासच्या पासपोर्टमध्ये (Passport) काही तफावत आढळून आली असून, त्याचा परिणाम त्याच्या भारतीय नागरिकत्वावर होण्याची शक्यता असल्याचेही केंद्राने न्यायालयात सांगितले. मात्र, कोणतेही लूकआउट सर्क्युलर असल्याची माहिती आपल्याला देण्यात आलेली नव्हती, असा दावा दासच्या वकिलांनी केला.

सौरव दास हा 'कॉकरोच जनता पार्टी'चा प्रमुख चेहरा असून, काँग्रेससह विरोधी पक्षांशी त्यांची जवळीक मानली जाते. 'सीजेपी चळवळी'वर बोलण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी ब्रिटनला जाण्यापासून त्याला रोखण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चेन्नईच्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने सोमवारी दासला नोटीस बजावून आठवडाभरात उत्तर देण्यास सांगितले होते. त्याच्या पासपोर्टवरील जन्मस्थळाच्या नोंदीत तफावत असल्याचा हा मुद्दा आहे. त्यानंतर दिलासा मिळवण्यासाठी दासने उच्च न्यायालयात धाव घेतली.

यापूर्वी, दासने सांगितले होते की, 27 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या लंडनमधील कार्यक्रमासाठी विमानात चढण्यापूर्वीच त्याला दिल्ली विमानतळावरील इमिग्रेशन काऊंटरवर अडवण्यात आले. परदेशी विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना संबोधित करण्यापासून रोखण्यासाठीच सरकारने परदेशात जाण्यापासून अडवले, असा आरोप त्याने सोमवारी रात्री सोशल मीडिया पोस्टद्वारे केला.

तरुणांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारी 'सीजेपी' संघटना अभिजित दिपकेने स्थापन केली. नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी तो भारतात परतला. दुसरीकडे, 'सीजेपी'ने कोणत्याही पक्षाशी औपचारिक संबंध जाहीर केले नसले तरी त्याचे नेते विरोधकांशी जवळून काम करतात; त्यामुळे तरुण मतदारांची दिशाभूल करणारी ही केवळ आणखी एक आघाडी असल्याची टीका सत्ताधारी भाजपने केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ 2nd Test Playing 11: प्रसिद्ध- सुंदर OUT, सिराज-जडेजा IN? दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग 11मध्ये होणार 3 मोठे बदल

Boiled Eggs: अंडी उकडताना वारंवार फुटतात? पाण्यात टाका फक्त अर्धा चमचा हा पदार्थ; सोलतानाही होणार नाही त्रास

Under 16 Cricket: शौर्य चोडणकरची फिरकीची जादू! 6 विकेट्स घेत महाराष्ट्राच्या फलंदाजांना दिले धक्के

Indian Constitution: संविधान दिनाच्या दिवशीच लोकशाहीसमोर प्रश्न; संविधानाची फसवणूक तर होत नाही ना?

Rahu Ketu Gochar 2026: धनलाभ आणि प्रगतीचा योग! राहु-केतुच्या गोचरने 'या' 3 राशींचे चमकणार नशीब; आर्थिक स्थिती होणार भक्कम

SCROLL FOR NEXT