Ramdev Baba  Dainik Gomantak
देश

बाबा रामदेव यांना कंपनी सुरु करण्यासाठी 40 हजार कोटींचं कर्ज, ब्रिटनमध्ये आयलँड गिफ्ट; कोण आहे हे जोडपे?

Couple gave loan to Baba Ramdev Patanjali Divya Pharmacy: योगगुरु बाबा रामदेव आणि त्यांची कंपनी पतंजली यांचे नाव आज देशभर पसरले आहे.

Manish Jadhav

Couple gave loan to Baba Ramdev Patanjali Divya Pharmacy: योगगुरु बाबा रामदेव आणि त्यांची कंपनी पतंजली यांचे नाव आज देशभर पसरले आहे. तथापि, या कंपनीच्या सुरुवातीस एका जोडप्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सुनीता आणि सर्वन सॅम पोद्दार असे या जोडप्याचे नाव आहे. बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी या जोडप्याकडून 2006 मध्ये कर्ज घेतले होते. हे जोडपे स्कॉटलंडचे आहे. या जोडप्याने लिटल कुंब्रे नावाचे आयलॅंड विकत घेतले आणि ते 2009 मध्ये रामदेव यांना भेट दिले. त्यांनी हे आयलॅंड दोन लाख पौंडांना विकत घेतले होते.

पतंजलीमध्ये 7.2 टक्के हिस्सा

एका रिपोर्टनुसार, 2011 मध्ये या जोडप्याची पतंजली कंपनीत 7.2 टक्के हिस्सेदारी होती. त्यांच्याकडे 12.46 लाख शेअर्स होते. आचार्य बाळकृष्ण यांच्यानंतर कंपनीचे 92 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेले ते दुसरे व्यक्ती होते.

बाबा रामदेव यांनी सुनीता यांना वजन कमी करण्यात मदत केली

बाबा रामदेव यांनी सुनीता यांना योगाद्वारे वजन कमी करण्यास मदत केली, ज्यामुळे सुनीता प्रभावित झाल्या आणि त्यांनी त्यांच्या पतीला बाबा रामदेव यांना आयलॅंड भेट देण्यास मनवले. एवढेच नाही तर सुनीता ब्रिटनमधील पतंजली योगपीठ ट्रस्टच्या विश्वस्तही बनल्या.

सुनीता यांचा जन्म मुंबईत झाला

सुनीता यांचा जन्म मुंबईत झाला, परंतु त्यांचे बालपण नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये गेले. सुनीता ग्लासगोमधील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहेत. त्या योगा इन्स्ट्रक्टर म्हणून काम करतात. ग्लासगोमध्येच त्यांनी बाबा रामदेव यांची भेट घेतली होती. सध्या, सुनीता Omminster Healthcare च्या CEO आणि संस्थापक आहेत. तर, सॅम पोद्दार यांचा जन्म बिहारमध्ये झाला होता. त्यांचे वडील ग्लासगो येथे डॉक्टर होते. सॅम वयाच्या अवघ्या 4 व्या वर्षी ग्लासगोला गेले. सॅम हे व्यवसायाने इंजिनिअर आहेत.

सुनीता आणि सॅम यांनी रामदेव यांना मदत केली

बाबा रामदेव यांनी एकदा सांगितले होते की, 1995 मध्ये त्यांच्याकडे दिव्या फार्मसीच्या नोंदणीसाठीही पैसे नव्हते. त्यावेळी योगगुरु म्हणून त्यांची लोकप्रियता कमी होती. जेव्हा लोकप्रियता वाढली तेव्हा त्यांनी कंपनीचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला, ज्यामध्ये त्यांना सुनीता आणि सॅम यांनी मदत केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

SCROLL FOR NEXT